शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांचे फुले देऊन स्वागत

By admin | Updated: December 22, 2015 01:00 IST

सौजन्यपूर्ण वागणूक सप्ताह : एसटी स्थानकामध्ये अडचणींबाबत चर्चा

कोल्हापूर : ‘आपले बसस्थानक परिसरात स्वागत आहे’. ‘अमुक गाडी थोड्याच वेळात येत आहे आपण प्रतीक्षा करा’, अशा आवाजात प्रवाशांना महामंडळाचे कर्मचारी आपुलकीने विचारत होते तसेच आगारातील स्पीकरवरूनही असा आपुलकीचा आवाज बसस्थानकांत घुमत असल्याने प्रवासीवर्गाला सुखद धक्का बसत आहे. निमित्त आहे सौजन्यपूर्ण वागणूक सप्ताहाचे. हा सप्ताह सोमवारपासून सुरू झाला असून २७ रविवारपर्यंत तो साजरा केला जाणार आहे.राज्य परिवहन महामंडळातर्फे प्रवाशांच्या सोयी-सुविधांकरिता अनेक योजना राबविल्या जातात. त्याच अंतर्गत सोमवारपासून दि. २७ रविवारपर्यंत ‘सौजन्यपूर्ण वागणूक सप्ताह’ साजरा केला जाणार आहे. या सप्ताहाची सोमवारी सुरुवात झाली. स्थानकप्रमुख अभय कदम यांनी सर्व कर्मचारी, चालक व वाहकांना सौजन्यपूर्ण वागणूक सप्ताहांची माहिती दिली. तसेच आवारात प्रवाशांची वैयक्तिक भेट घेऊन प्रवाशांना एस. टी. महामंडळाच्या बसेसमधील अडचणींबाबत विचारणा करण्यात आली. तसेच प्रवास कसा सोपस्कार आहे याबाबत चर्चा केली. यासह एस. टी. बसेस प्रवाशांनीच स्वच्छ ठेवण्याची विनंतीही केली.सप्ताहाचा पहिला दिवस असल्याने दिवसभर मध्यवर्ती बसस्थानक आवारात स्पीकरवरून ‘सुस्वागतम, सुस्वागतम आपले कोल्हापूर बसस्थानकातर्फे स्वागत’ असा आवाज प्रवासी बंधू-भगिनींच्या कानावर पडत होता. प्रवासीवर्गास गावाच्या गाडीची माहिती कंट्रोल केबिनमधून देण्यात येते. आगारामध्ये लागलेल्या गाड्या ज्या गावांना जाणार आहेत, त्याबाबत स्पीकरच्या माध्यमाने जाहीर करत प्रवाशांपर्यंत माहिती पुरविली जात होती. बसचालक, वाहक प्रवाशांशी आपुलकीने सुसंवाद साधत होते. प्रवाशांनी काही प्रश्न विचारताच वाहक , कंट्रोल रूममधील वैतागलेले कर्मचारी आज मात्र प्रत्येक प्रवाशांशी आपुलकीने बोलत असल्याचे पाहून प्रवाशांनाही दिवसभर सुखद धक्का बसत होता. महामंडळाच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले, पण हा उपक्रम फक्त सप्ताहापर्यंतच मर्यादित न राहता कायमस्वरूपी राबवावा, अशी मागणीही प्रवाशांनी केली. विशेष नोंदी घेणारसौजन्य सप्ताहादरम्यान महामंडळाच्यावतीने प्रवाशांच्या प्रतिक्रिया नोंदविल्या जाणार आहेत. त्यामध्ये प्रवाशांनी आपल्या सूचना व तक्रारी नोंदवायच्या आहेत. या मोहिमेअंती प्रवाशांकडून मिळालेल्या प्रतिक्रियांच्या आधारे सौजन्यपूर्ण वर्तणूक करणारे चालक व वाहक, वाहतूक नियंत्रकांची माहिती एकत्र करून त्यांना अभिनंदन पत्र देण्यात येईल. तसेच प्रवाशांशी सौजन्यपूर्ण वर्तणूक न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.