लोकमत न्यूज नेटवर्क
शिरोली : शिरोली गावाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन आमदार राजूबाबा आवळे यांनी दिले. शिरोली - माळवाडी येथील कोरगावकर कॉलनी ते मेघराज काॅलनी रस्त्याच्या काॅंक्रिटीकरण कामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कामाचे उद्घाटन आवळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार आवळे म्हणाले, शिरोली ही हातकणंगले मतदार संघातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. या गावाचा विस्तार वाढला असून, विकासाच्या संधी आहेत. शिरोलीने माझ्या विजयात मोलाचा वाटा उचलला असून, गावाच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी आहे. त्यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे.
यावेळी सरपंच शशिकांत खवरे, संजय गांधी योजना सदस्य बाजीराव सातपुते, वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उत्तम पाटील, विठ्ठल पाटील, सरदार मुल्ला, न्यामतबी मुल्ला, अनिता कांबळे, डाॅ. सुभाष पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
फोटो ओळी : शिरोली येथील रस्त्याच्या कामाचे उद्घाटन आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाजीराव सातपुते, उत्तम पाटील, सरदार मुल्ला, डॉ. सुभाष पाटील आदी उपस्थित होते.
१६ शिरोली वर्क