शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला आम्ही घाबरणारे नाही; आत्महत्या घटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:28 IST

विविध कारणांनी नैराश्य येऊन जिल्ह्यात आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. २०१९ मध्ये सुमारे ५७० जणांनी आत्महत्या केल्या तर २०२० या ...

विविध कारणांनी नैराश्य येऊन जिल्ह्यात आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. २०१९ मध्ये सुमारे ५७० जणांनी आत्महत्या केल्या तर २०२० या कोरोना संकटात अर्थचक्रच बंद पडल्याने अनेक उद्योगधंदे बंद पडले, नोकऱ्या गेल्या, आर्थिक नुकसान झाले, जवळचे कोरोनाने गेले, माणसे व्यसनाधीन बनली, परिणामी माणसात प्रचंड नैराश्य येऊन स्वत:ला असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. नकारात्मकता वाढल्याने अनेकांनी जगण्याची उमेद हरवली, त्यातून आत्महत्या केल्या. २०२० मध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढले, वर्षभरात सुमारे ६१९ जणांनी आत्महत्या केल्या. आता २०२१ च्या सुरुवातीस अनेकजण सावरत असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा डोके वर काढले. हे संकट फक्त आपल्यावरच नाही, सारेच अडचणीत असल्याची भावना अनेकांच्या मनात निर्माण झाली, त्यामुळे गेल्या तीन महिन्यांत कोरोना संकटामुळे आत्महत्येचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र आहे.

पॉईंटर...

- २०१९ मध्ये झालेल्या आत्महत्या : ५७०

- २०२० मध्ये झालेल्या आत्महत्या : ६१९

- २०२१ जानेवारी ते मार्च : ११४

संकट माझ्या एकट्यावर नाही

कोरोना संकटात मी एकटा अडचणीत नाही तर सारेच अडचणीत आहेत अशी भावाना प्रत्येकात निर्माण झाली पाहिजे. वस्तुस्थितीची जाणीव करून सकारात्मक विचार करून मार्ग काढणे, नैराश्येत मानसोपचार तज्ज्ञ अगर समुपदेशकांकडून उपचार घेणे, कौटुंबीक संवाद, सकारात्मक छंद वाढविणे, अशामुळे आत्महत्येचे प्रमाण कमी येऊ शकेल.

- डॉ. निखिल चौगले, मानसोपचार तज्ज्ञ

कोरोना संकटात १३ आत्महत्या

कोरोना संकटात अडचणीत आल्याने गेल्या वर्षभरात नैराश्येतून जिल्ह्यात तेरा जणांनी कोरोनाचे कारण देऊन आत्महत्या केल्या. इतरही आत्महत्या झाल्या, पण त्यासाठी ठोस कारण प्रशासनाच्या हाती लागले नाही.