शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

सोमवारपासून दोन दिवस पाणीपुरवठा बंद

By admin | Updated: June 11, 2016 00:29 IST

चंबुखडी पाण्याच्या टाकीपर्यंतच्या ७५० मि.मी. व्यासाच्या दाब नलिकेवरील गळती काढण्याचे काम सोमवारी सुरू करण्यात येत आहे.

कोल्हापूर : बालिंगा जलशुद्धिकरण केंद्र ते चंबुखडी या दरम्यानच्या मुख्य जलवाहिनीवरील गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात येणार असल्यामुळे बहुतांश भागांत सोमवार (दि. १३) पासून दोन दिवस पाणीपुरवठा होणार नाही; तर काही भागांत अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. दोन दिवस पाणीपुरवठा न झाल्यामुळे टंचाईसदृश परिस्थिती जाणवल्यास त्या भागात टँकरने पाणीपुरवठा होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे जाहीर केले आहे. भोगावती नदीतून बालिंगा येथून पाणी उपसा करून ते गावातील जलशुद्धिकरण केंद्रात टाकण्यात येते. तेथून शुद्धिकरण करून चंबुखडी टाकीत टाकून तेथून वितरण शहराच्या ए, बी, सी, डी आणि ई वॉर्डांतील काही भागांत वितरित होते; पण बालिंगा जलशुद्धिकरण केंद्रापासून चंबुखडी पाण्याच्या टाकीपर्यंतच्या ७५० मि.मी. व्यासाच्या दाब नलिकेवरील गळती काढण्याचे काम सोमवारी सुरू करण्यात येत आहे. यामुळे सोमवारी सकाळी काही भागांत पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे; पण नंतर ही जलवाहिनी रिकामी करून ती दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ए, बी वॉर्डांतील आपटेनगर, बालिंगा जलउपसा केंद्रांवर व चंबुखडी टाकीवर अवलंबून असलेल्या शिवाजी पेठ, मंगळवार पेठ परिसर, रंकाळा परिसर, फुलेवाडी, लक्षतीर्थ वसाहत तसेच संपूर्ण सी व डी वॉर्ड तसेच ई वॉर्डातील शाहूपुरीमधील काही भाग, शिवाजी उद्यमनगर परिसर, या भागांत दोन दिवस पाणीपुरवठा होणार नाही.टँकरने पाणीपुरवठाज्या भागात पाणीटंचाई जाणवेल, त्या भागात महापालिकेच्या आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. याशिवाय गरज लागल्यास खासगी टँकरद्वारेही पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. येथे पाणीपुरवठा नाहीए, बी वॉर्ड : संपूर्ण शिवाजी पेठ, मंगळवार पेठ परिसर, रंकाळा, फुलेवाडी, लक्षतीर्थ वसाहतसंपूर्ण सी आणि डी वॉर्ड.ई वॉर्ड : शाहूपुरीमधील काही भाग, शिवाजी उद्यमनगर परिसर