शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

उन्हाळ्यात तहान भागण्याइतपत जिल्ह्यात पाणीसाठा

By admin | Updated: February 27, 2015 23:24 IST

पंच्याहत्तर टक्के साठा शिल्लक : गतवर्षीपेक्षा पाच टक्के जादा; पाणी जपून वापरण्याचे ‘पाटबंधारे’चे आवाहन

प्रकाश पाटील- कोपार्डे -फेब्रुवारी महिना संपता संपताच महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना पाणीटंचाईच्या झळा बसण्याच्या शक्यता शासकीय पातळीवर वर्तविण्यात येत आहेत. कोल्हापूर जिल्हा मात्र सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण असणार आहे. जिल्ह्यातील सर्वच प्रमुख धरणांतील व जलाशयातील पाणीसाठा समाधानकारक असून, मागील वर्षी याच कालावधीत असणाऱ्या पाणीसाठ्यापेक्षा तो पाच टक्क्यांनी जास्त असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात सध्या जवळपास ७५ टक्के पाणीसाठा आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी, तुळशी, वारणा, दूधगंगा हे कोल्हापूर पाटबंधारे विभागांतर्गत येणारे मोठे चार प्रकल्प आहेत. तर कासारी, कडवी, कुंभी, पाटगाव, चिकोत्री, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा हे आठ मध्यम प्रकल्प आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रकल्पामध्ये ७१ टक्के सरासरी पाणीसाठा आज शिल्लक असून याच दिवशी मागील वर्षी तो ६६ टक्के होता. तर मध्यम प्रकल्पामध्ये तो आजच्या दिवशी ७५ टक्के असून मागील वर्षी याच दिवशी तो ७० टक्के होता. सरासरी पाहता मोठ्या व मध्यम प्रकल्पामध्ये मागील वर्षापेक्षा पाच टक्के पाणीसाठा आजच्या घडीला जादा आहे. पाणीसाठा समाधानकारक असला तरी विशेषत: ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ठिबक पद्धतीचा वापर करून पाटपद्धतीने पाणी देण्याच्या पद्धतीला फाटा द्यावा व पाणी बचत करावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. प्रकल्प आजचा पाणीसाठाटक्केवारीमागील वर्षी याच टक्केवारी (द. ल. घ. मीटरमध्ये)दिवशीचा पाणीसाठा राधानगरी१४५.८७६६ %१७३.८७७९ %तुळशी६४.४५७० %५७६२ %वारणा ५९४.७१७६ %५४१६९ %दूधगंगा४४५.७२६६%३८८.८०५७ %एकूण१२५०.७५७१ %११६१.०५६६ %