शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

‘वॉल आॅफ चायना’ गौरवामुळे बदल--

By admin | Updated: December 15, 2014 00:13 IST

कोल्हापूरचा फुटबॉल...

एकोणीसशे सत्तर साली गुजरात येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी माझी निवड शिवाजी विद्यापीठाच्या फुटबॉल संघात गोलरक्षक म्हणून झाली. ३ जून १९७० या दिवशी आमचा सामना जबलपूर विद्यापीठाशी होता. यात आमच्यासमोर तगडे, उंचेपुरे असे जबलपूरचे खेळाडू होते. मला नेहमीप्रमाणे फुटबॉल कधी माझ्या गोलक्षेत्रात येतो आणि मी तो झपकन कधी पकडतो असे झाले होते. या सामन्यात मी जबलपूरच्या आक्रमणाची धार बोथट केली होती. कोणताही आणि कसाही चेंडू माझ्या गोलजाळ्यात येऊ दे; मी तो अडवणारच या आत्मविश्वासाने तटवीत होतो. या सामन्यात अत्यंत तंत्रशुद्ध आणि खोलवर चढाया करण्यात जबलपूरचा संघ कुशल होता. त्यांनी अनेकवेळा आमच्यावर चढाया केल्या. मी मात्र त्यांचे गोल करण्याचे इरादे वारंवार फोल ठरविले. त्यामुळे आमच्या संघाने त्या टीमचा ४-१ असा लीलया पराभव केला. यात माझ्या गोलरक्षणाचा मोठा वाटा होता. दुसऱ्या दिवशी एका इंग्रजी दैनिकाने मला ‘वॉल आॅफ चायना’ म्हणून गौरविले. हा सन्मान माझ्यासारख्या गोलरक्षकाला मोठा वाटला आणि पुढे या सामन्यामुळे माझ्यातील गोलरक्षक अखंडपणे वीस वर्षे कोल्हापूरच्या फुटबॉलमध्ये ‘पक्या रेडेकरची पकड’ म्हणून फुटबॉल शौकिनांच्या मनात घर करून राहिला... असे एक ना अनेक किस्से ‘आठवणीतील फुटबॉल’ सामन्याविषयी प्रॅक्टिस क्लबचे माजी गोलरक्षक प्रकाश रेडेकर सांगत होते. स्थानिक सामन्यात शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस क्लब यांच्यात तीन दिवस एक सामना सुरू होता. या सामन्यात मला गोलरक्षण करण्याची संधी मिळाली. यामध्ये मी तीन पेनल्टी अडविल्या. सामन्यात विजय झाला. ‘बालगोपाल’चे रघू पिसे हे अत्यंत थंड डोक्याने गोल करीत. त्यामुळे त्यांचा गोल कसा अडवायचा, असा विचार त्याकाळी माझ्या मनात कायम यायचा. त्यांचा तंत्रशुद्ध खेळ आजही माझ्या मनात घर करून आहे. अशी खेळी मी आजही पाहिली नाही. गडहिंग्लज येथे ‘मंड्या रेड मंड्या’ या कर्नाटकातील संघाविरुद्ध मी ‘पोल टू पोल डाय’ मारत चेंडू बाहेर काढला. रेफ्रीला वाटले गोल झाला. मात्र, समोरच्या संघातील कप्तानाने सांगितले, गोल बाहेर काढला आणि चांगले गोलरक्षण केले म्हणून माझी पाठ त्याने थोपटली.-शब्दांकन : सचिन भोसले