शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
4
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
5
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
6
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
7
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
8
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
9
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
10
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
11
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
12
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
13
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
14
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
15
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
16
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
17
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
18
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
19
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
20
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन

‘वालचंद’साठी मंत्रिपद धुडकावले

By admin | Updated: January 15, 2017 01:10 IST

संजयकाका पाटील : जशास तसे उत्तर देणे हा नाईलाज होता!

सांगली : वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय वाचविण्याचा विषय ज्यावेळी चर्चेत होता, त्याचवेळी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या. अनेक राजकीय नेत्यांनी, तज्ज्ञांनी मला या प्रकरणात न पडण्याबाबत सांगितले, तरीही मंत्रिपदाची संधी धुडकावून मी ‘वालचंद’ वाचविण्याचा निर्णय घेतला, असे स्पष्टीकरण खासदार संजयकाका पाटील यांनी शनिवारी दिले. येथील वालचंद महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले की, महाविद्यालयाशी संबंधित काही लोक माझ्याकडे आले आणि त्यांनी याप्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली. त्यावेळी गुंडगिरीच्या माध्यमातून काही लोकांनी महाविद्यालयाचा ताबा घेतला होता. हा विषय पेटला असताना केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या. त्यावेळी काही लोकांनी मला वेड्यासारखे न वागण्याची सूचना केली. माझेही विचार काहीवेळ बदलले. कोणाच्या महाविद्यालयात किती लक्ष घालायचे आणि तिकडे आपण डावावर लागायचे, असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. त्यानंतर महाविद्यालयाचा एकूण प्रवास आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्याची ख्याती लक्षात घेतल्यानंतर जिल्'ाचे वैभव म्हणून ‘वालचंद’च्या विषयात लक्ष घालण्याचा निर्णय मी घेतला. मंत्रिपदाच्या संधीची कोणतीही पर्वा केली नाही. सुरुवातीला चांगुलपणा दाखविण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने नाईलाजास्तव महाविद्यालयात येऊन जशाच तसे उत्तर द्यावे लागले. एक चांगली संस्था गुंडगिरीच्या जोरावर आणि खोट्या कागदपत्राच्या जोरावर कोणीतरी गिळंकृत करू पाहात होते. आता त्यांना विरोध केला नसता, तर भविष्यात अशाच गोष्टींच्या जोरावर ते यशस्वी झाले असते. महाविद्यालयाचे नुकसान होत असल्याने न्यायालयीन निर्णयाची वाट पाहणेही आम्हाला तोपर्यंत शक्य नव्हते. आता कोणतीही अडचण महाविद्यालयासमोर नाही. अशा महाविद्यालयीन कार्यक्रमांमध्ये माझ्यासारख्या राजकीय व्यक्तीने सहभागी होणे योग्य की अयोग्य, हे मला माहीत नाही, पण हे महाविद्यालय आम्हाला सांगलीचे वैभव वाटते. आता ते ख्यातीप्रमाणे पुढे जात आहे. माजी विद्यार्थ्यांनी धन नाही दिले तरी चालेल, पण तन आणि मन तेवढे महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. राजकारणी शिक्षणसम्राटांकडून धनवंतांनाच प्रवेशवालचंद महाविद्यालय ही गुणवत्तेवर आधारित शिक्षण देणारी संस्था आहे. खरेतर आम्हा राजकारण्यांच्या संस्थांचा गुणवत्तेशी फारसा संबंध येत नाही. धनवंत बापाच्या पोरांना प्रवेश देऊन आम्ही शिक्षणसम्राट होतो. मात्र, येथे तसे नसल्याने ‘वालचंद’बद्दल माझ्या मनात आदरभाव आहे, असे संजयकाका पाटील म्हणाले.