शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

मनपा शाळेला गतवैभवाची प्रतीक्षा

By admin | Updated: February 18, 2015 23:43 IST

प्रभागात निवडणुकीचे वारे : नगरसेवकांचा जनसंपर्क चांगला, पण समस्या सोडविण्यात कमी

कोल्हापूर : जुना बुधवार पेठेतील श्री शाहू विद्यालय काही वर्षांपूर्वी भागातील एक उत्तम शाळा म्हणून प्रसिद्ध होती; पण स्थानिक नगरसेवकांसह महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्र्लक्ष होत आहे. त्यामुळे शाळेचे वैभव हरवले असून, शाळा शेवटची घटका मोजत आहे. गरीब, मध्यमवर्गीय लोकांची वस्ती असलेल्या या प्रभागात ही शाळा महत्त्वाची आहे. त्यामुळे शाहू विद्यालयाला गतवैभव कधी मिळणार असा रहिवाशांचा प्रश्न आहे. याबरोबरच इतर प्रभागाप्रमाणे येथे देखील आयुर्मान संपलेल्या ड्रेनेज लाईन, तुंबलेल्या गटारी अशा समस्या कायम आहेत.नगरसेवकांचा प्रभागात चांगला जनसंपर्क आहे; पण नागरी समस्या सोडविण्यात ते कमी पडत असल्याच्या भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. या प्रभागात काही भाग दाटीवाटीच्या वस्तीचा असल्यामुळे येथे मूलभूत सुविधांची मोठी गरज आहे. भागातील ड्रेनेजलाईनचा विस्तार आणि आधुनिकीकरण करणे ही सर्वांत प्रमुख बाब बनली आहे.तोरस्कर चौक प्रभागात गत दहा वर्षांपासून झालेल्या निवडणुकीत मुस्लिम समाजाचे मतदान निर्णायक ठरल्याचा इतिहास आहे. प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारांची संख्या जास्त असल्याने आठशे ते एक हजार मते घेणारा उमेदवार निवडून येतो. त्यामुळे प्रत्येक उमेदवार एक-एक मतासाठी झगडतो, असे या प्रभागाचे वैशिष्ट्य आहे. आता प्रभाग रचना पूर्ण होऊन दहा वर्षे झाली आहेत. तरीही, गतवेळच्या निवडणुकीतील पराभूत उमेदवार आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. प्रभाग रचना होवो अगर न होवो, येथील लढत ही कायम रंगतदारच असते, असा आजपर्यंतचा इतिहास आहे.उर्वरित आठ महिन्यांत सुुमारे ७५ लाख रुपयांची नियोजित कामे आहेत. यामध्ये संपूर्ण ड्रेनेज लाईन बदलणे याला प्राधान्य असेल. प्रभागात एलईडी बल्ब बसविण्याचा मानस आहे. श्री शाहू विद्यालयाच्या इमारतीची डागडुजी अशी कामे होणार आहेत.- दिगंबर फराकटे, नगरसेवक