शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हेर्लेत मारहाणीनंतर वेटरची आत्महत्या

By admin | Updated: May 14, 2016 01:39 IST

हॉटेलबाहेर घडला प्रकार : सातारा येथील हॉटेलमालकासह तिघांकडून कृत्य

हातकणंगले : हेर्ले येथील सोनल हॉटेलमध्ये शुक्रवारी दुपारी तीन वाजता नामदेव सुरेश आवडणकर (वय २७, रा. तोरस, ता. चंदगड) या वेटरला हॉटेलच्या बाहेर बोलावून सातारा येथील ‘राजयोग’चे मालक महेश देशपांडे, सातारा उपनिबंधक कार्यालयातील आॅफिस सुपरिंटेंडंट चेतन शामराव जावीर आणि दिशा कुंभार या तिघांनी लोखंडी सायकल चेनने मारहाण केली. मारहाणीच्या भीतीने नामदेव आवडणकर हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन मोठ्या सिंटेक्स पाण्याच्या टाकीत उडी मारून जीव दिला. नामदेव आवडणकर याची उत्तरीय तपासणी सीपीआर इस्पितळात सुरू आहे. या घटनेचा गुन्हा रात्री उशिरापर्यंत हातकणंगले पोलीस ठाण्यात दाखल करण्याचे काम सुरू होते. याबाबत हातकणंगले पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, नामदेव आवडणकर हा गेल्या वर्षी सातारा येथील हॉटेल राजयोगमध्ये वेटरचे काम करत होता. गेली पंधरा दिवस तो हेर्ले येथील सोनल हॉटेलमध्ये काम करीत होता. सातारा येथे वेटरचे काम करत असताना त्याचे राजयोग हॉटेलमध्ये कामाला असलेल्या दीपा कुंभारशी जुळले होते. गेली पंधरा दिवस नामदेवने सातारा येथील राजयोग हॉटेलमधील काम सोडून तो येथे होता. मात्र येथे आल्यापासून तो तिला फोन करून त्रास देत होता. फोनवरून अश्लील संभाषण करीत असे, याचा जाब विचारण्यासाठी टाटा नॅनो कार एम एच ११ ए डब्लू १५४४ घेऊन दीपा कुंभार, राजयोग हॉटेलचे मालक महेश मधुकर देशपांडे आणि सातारा उपनिबंधक कार्यालयातील आॅफिस सुपरिंटेंडंट चेतन शामराव जावीर हे तिघे हेर्ले येथील सोनल हॉटेलमध्ये आले. त्यांनी वेटरला हॉटेल बाहेर बोलावून मारहाण करण्यास सुरुवात केली. दीपा कुंभार हिच्या हातात लोखंडी साखळी तर महेश देशपांडे यांच्या हातात सायकल चेन होती. भयभीत झालेला वेटर नामदेव पळत तिसऱ्या मजल्यावर गेला आणि पाण्याच्या टाकीत उडी मारली. नामदेवला पोहायला येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याला शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथील सीपीआर इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. हातकणंगले पोलिस सायंकाळी सहा वाजता हॉटेल सोनलमध्ये दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दीपा कुंभार, महेश देशपांडे आणि चेतन जावीर यांना ताब्यात घेऊन हातकणंगले पोलिस ठाण्यात स्थानबद्ध केले आहे. (प्रतिनिधी)