शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

वडगाव पालिका घरोघरी देणार कचराकुंड्या

By admin | Updated: December 10, 2015 01:03 IST

महिन्यात अंमलबजावणी : सहा हजार घरांना देणार प्रत्येकी दोन कुंड्या, लोकसहभागातून कुंड्या संकलनाचे नियोजन

सुहास जाधव- पेठवडगाव --‘स्वच्छ भारत’ आवाहनास प्रतिसाद देत व शहरातून दररोज निघणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वडगाव पालिकेने ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. पालिकेने पुढाकार घेत लोकसहभागातून कचराकुंड्या मिळाव्यात, याचे नियोजन केले आहे. शहरातील सुमारे सहा हजार घरांना प्रत्येकी दोन कचराकुंड्या पुरविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या कचराकुंड्यांमध्ये ओला आणि सुका कचरा वेगवेगळा केला जाईल, तसेच पालिकेच्या घंटागाड्यांद्वारे कचरा संकलन केले जाणार आहे.जिल्ह्यासह राज्यातील या पथदर्शी प्रकल्पाची अंमलबजावणी विधानपरिषद निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर राबविण्यात येणार आहे. पालिकेने एक दिवसा आड घंटागाडीद्वारे घरातून कचरा संकलन अभियान यशस्वीपणे राबविले आहे. त्याचाच पुढचा भाग म्हणून नागरिकांत कचराकुंड्या देण्यासाठी नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.सध्या शहरात तीन घंडागाड्या व उर्वरित शहरातील कचरा दोन ट्रॅक्टरमधून संकलित करण्यात येतो. हा कचरा ओला व सुका एकत्रित असतो. हा कचरा डेपोत संकलित केला जातो. या पार्श्वभूमीवर शहरातील ओला कचरा थेट घरातून वेगळा करून संकलित करण्याचे पालिकेने नियोजन केले आहे. या ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट, गांडूळ खत प्रकल्प राबविण्यात येणार आहे. शहरात प्रत्यक्षात सुमारे सात हजार मिळकतधारक आहेत. यात रहिवासी विभागातील सहा हजार घरे आहेत. यातील प्रत्येक घरात कचराकुंड्या वितरित केल्या जाणार आहेत. दोन वेगवेगळ्या पद्धतीने नागरिक त्यांचे संकलन करणार आहेत. तशी सुविधा कचरा उचलणाऱ्या अ‍ॅपे रिक्षा (घंटागाडी) वाहनामध्ये करण्यात येणार आहे.लोकसहभागातून कचराकुंड्या मिळाव्यात, यासाठी पालिका प्रशासनाने चाचपणी केली आहे. त्यास शहरातील काही बॅँकांनी तत्काळ प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत सहा हजार कचराकुंड्या मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.उत्पन्नात भर पडण्यासाठी खताचे नियोजनस्वच्छतेच्यादृष्टीने कचरा उठाव यशस्वी झालेले आहे. पालिकेच्या उत्पन्नात भर पडावी, यासाठी ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट, गांडूळ खताचे नियोजन पालिकेने केलेले आहे. तरी नागरिक, बॅँका, पतसंस्था, विविध संस्था, सामाजिक संस्था, तरुण मंडळे व दानशूर व्यक्तींनी लोकसहभागातून कचराकुंडी दान उपक्रमास सहकार्य करावे. पाच लिटरच्या कुंड्या देण्याचे नियोजन केले असून, कुंड्या दान करण्यासाठी पालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याधिकारी नागेंद्र मुत्तेकर यांनी केले आहे.