शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

गाववाले सांगत्यात तिथं मत टाकायचं...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 00:33 IST

कोल्हापूर-उत्तूर 70 कि.मी. समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : नोटाबंदी, राफेल घोटाळा, स्ट्राईक हे वृत्तपत्र व दूरचित्रवाणीवरून ...

कोल्हापूर-उत्तूर70 कि.मी.समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : नोटाबंदी, राफेल घोटाळा, स्ट्राईक हे वृत्तपत्र व दूरचित्रवाणीवरून गाजत असलेले मुद्दे सर्वसामान्य मतदारांच्या चर्चेत नसल्याचे वास्तव अनुभवण्यास मिळाले. कोल्हापूर-चंदगड एस.टी.मधून निपाणीपर्यंत व तेथून पुन्हा कोल्हापूर-आजरा बसमधून उत्तूरपर्यंत प्रवाशांना बोलते केल्यानंतर त्यांचे विश्व वेगळेच असल्याचे जाणवले.चंदगड तालुक्यातील शिरगावच्या साठी ओलांडलेल्या भारती मुळीक यांना ‘काय म्हणते इलेक्शन’असे विचारले तर त्या म्हणाल्या, ‘शिवजयंती हाय जनू, भगवे झेंडे दिसत्यात. उमेदवार कोण माहिती नाही. गाववाले टाक म्हणतील तिथं मत टाकायचं.’अ‍ॅटोमोबाईलमधील मार्केटिंगचे काम करणारे कोल्हापूरचे विलास डोनेन्यावर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणखी संधी दिली पाहिजे. त्यांनी थेट खात्यात अनुदान देण्याची योजना काढल्यामुळे मध्येच जिरणारे पैसे बंद झाले. जरा शिस्त लावली आहे. आताच्या खासदारांचे काम चांगले आहे. मात्र, आम्हाला भाजप सरकार पाहिजे आहे.आजरा तालुक्यातील एरंडोळ येथील सीताराम घुरे यांना लोकसभेबाबत विचारले, तर ते भरमूआण्णा पाटील, अशोक चराटी, प्रकाश आबिटकर ही विधानसभेशी संबंधित नावे घेत राहिले, पण लोकसभेबाबत त्यांनी शेवटपर्यंत एक शब्द तोंडातून काढला नाही. ते कोल्हापुरात हॉटेलमध्ये नोकरीस आहेत.कामात फरक पडत नाहीसचिन पाटील मूळचा उत्तूरजवळच्या वडकशिवालेचा. पुण्यातून कोल्हापुरात रोजगारासाठी आला आहे. त्याच्या मते, सरकार कुणाचेही आले तरी आपल्या कामात काही फरक पडत नाही. गावात भाजपने चांगले काम सुरू केले आहे, तर राष्ट्रवादीही चांगली आहे, असे त्यांने सांगितले.