शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वारणा धरणग्रस्त व चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या भेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:18 IST

पट्टणकोडोली : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील वारणा धरणग्रस्त व चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्यांबाबत खासदार धैर्यशील माने यांनी अप्पर जिल्हाधिकारी ...

पट्टणकोडोली : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील वारणा धरणग्रस्त व चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्यांबाबत खासदार धैर्यशील माने यांनी अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांच्यासोबत बैठक घेतली होती. त्याअनुषंगाने २९ डिसेंबरपासून गावनिहाय भेटी देऊन नागरिकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी परिपत्रक काढले आहे. त्यामुळे यातून अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत.

वारणा धरणग्रस्त व चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्यांबाबत खासदार धैर्यशील माने यांनी १० डिसेंबर राेजी चांदोली अभयारण्य व वारणा प्रकल्प संघटनांतील पदाधिकारी व गौरव नायकवडी यांना सोबत घेऊन अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांच्याबरोबर बैठक घेतली होती. यामध्ये वसाहतींचे विविध प्रलंबित प्रश्न मांडले होते. प्रत्येकी सोळा वसाहतींमध्ये समक्ष जाऊन प्रश्न सोडविण्याबाबत सांगितले होते. माने यांच्या या बैठकीनंतर आज जिल्हाधिकार्‍यांनी प्रत्यक्ष वसाहतींमध्ये जाण्यासाठी परिपत्रक काढले आहे. यामध्ये पुनर्वसन उपजिल्हाधिकारी वारणा कालवे विभागाचे कार्यकारी अभियंता, प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक, जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच हातकणंगले, पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यांचे तहसीलदार यांचा समावेश असणार आहे.