शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हीआयपी चषक’ ‘अण्णा मोगणे’कडे

By admin | Updated: April 20, 2015 00:22 IST

युवराज युवलूसकर, विशाल कल्याणकर, विशाल मोरे यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत लक्षणीय कामगिरी

कोल्हापूर : कोल्हापूरच्या अण्णा मोगणे सहारा संघाने मुंबईच्या राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर (आरसीएफ) संघावर २० धावांनी मात करत व्हीआयपी चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. सामन्यात मोगणे संघाच्या युवराज युवलूसकर, विशाल कल्याणकर, विशाल मोरे यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत लक्षणीय कामगिरी केली. शास्त्रीनगर मैदान येथे रविवारी अण्णा मोगणे सहारा व आरसीएफ संघात अंतिम सामना झाला. नाणेफेक जिंकत ‘आरसीएफ’ संघाने प्रथम गोलंदाजी घेत प्रथम फलंदाजीस मोगणे संघास पाचारण केले. मोगणे संघाकडून ४० षटकांत सर्वबाद २९७ धावा करण्यात आल्या. त्यात युवराज युवलूसकर ९२, विशाल कल्याणकर ७०, विशांत मोरेने ७०, तर सूरज शिंदे याने नाबाद २२ धावा केल्या. ‘आरसीएफ’कडून अरसलान शहा, संतोष उपाध्ये यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर आदिनाथ गायकवाड, तरंजितसिंग धिल्लॉन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना फलंदाजीस आलेल्या ‘आरसीएफ’ संघाकडून सुनील चावरीने ९०, संतोष उपाध्येने ४७ धावा करत दमदार सुरुवात केली. त्यास शिवम दुबे यांनी चांगली साथ दिली. मात्र, अण्णा मोगणे संघाच्या भरत पुरोहित, वैभव चौगुले, अमोल निलुगडे, विकास जाधव यांच्या दमदार गोलंदाजीसमोर त्यांचा टिकाव लागला नाही. भरत पुरोहितने ‘आरसीएफ’चे चार फलंदाज टिपत विजय दृष्टिक्षेपात आणला. ‘आरसीएफ’चा संपूर्ण संघ ४० षटकांत सर्वबाद २७७ धावांतच गुंडाळत अण्णा मोगणे संघाने विजयावर आपली मोहोर उठवली. स्पर्धेचा बक्षीस समारंभ आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू ऋचा पुजारी व कपिल पाठारे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटणकर, माजी नगरसेवक काका पाटील, नगरसेवक राजू हुंबे, उमेश माने, राजू पठाण आदी उपस्थित होते.