शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
4
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
5
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
6
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
8
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
9
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
10
घटस्फोटाच्या चर्चा, चतुर्थीला नववधूसारखी नटली ही अभिनेत्री, एकटीनेच केली बाप्पाची पूजा
11
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
12
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
13
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
14
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
15
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
16
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
17
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
18
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
19
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
20
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

‘लोकमत दीपोत्सव’चे विनोद भोकरे मानकरी

By admin | Updated: October 31, 2015 00:23 IST

पहिला ड्रॉ जाहीर : ३२ इंची एलईडीचे बक्षीस, व्यावसायिक - ग्राहकांचा दुहेरी फायदा करून देणारी सोडत

कोल्हापूर : दसरा व दिवाळी उत्सवांच्या निमित्ताने व्यावसायिक व ग्राहकांचा दुहेरी फायदा करून देणाऱ्या ‘लोकमत दीपोत्सव २०१५’च्या दसरा सोडतीत विनोद भोकरे (कुपन क्रमांक १२६६८, रॉयल ब्ल्यू) हे भाग्यवान विजेते ठरले. ‘दीपोत्सव’च्या पहिल्या (दसरा) ड्रॉमधील ‘एलईडी ३२ इंची टी.व्ही.’ हे प्रथम क्रमांकाचे बक्षीस त्यांना जाहीर झाले. योजनेतील बक्षिसांचा पहिला म्हणजेच दसरा लकी ड्रॉ शाहूपुरीतील ‘राजाकाका ई-मॉल’मध्ये शुक्रवारी सायंकाळी उत्साही वातावरणात काढण्यात आला.विविध व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाची स्वतंत्रपणे व किफायतशीर दरात दसरा-दिवाळीदरम्यान जाहिरात करून ग्राहकांना आकर्षित करता यावे, तसेच ग्राहकांचाही सणाचा आनंद बक्षिसांनी द्विगुणित व्हावा, यासाठी राजाकाका ई-मॉल आणि मेसर्स गोपीनाथ अनंत चिपडे सराफ प्रस्तुत ‘लोकमत’तर्फे ‘दीपोत्सव २०१५’ या योजनेचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेचे रॉयल ब्ल्यू मल्टिट्रेड प्रायव्हेट लिमिटेड, व्ही. काकडे सराफ, अ‍ॅक्वॉ क्रिस्टल, सुभाष फोटोज्, वारणा, जसवंत स्वीट्स हे प्रायोजक आहेत.यावेळी राजाकाका ई-मॉलचे दीपक केशवानी, चिपडे सराफचे गिरीधर चिपडे, रॉयल ब्ल्यूचे मनोज कोळेकर, व्ही. काकडे सराफचे नंदकुमार काकडे, सुभाष फोटोग्राफिक्सचे शशिकांत ओऊळकर, साई सर्व्हिसेसचे आदिनाथ पाटील व राहुल पाटील, आयएफबीचे सिद्ध पारशेट्टी, सॅमसंगचे उज्ज्वल जैस्वाल, ओनिडाचे विशाल क्षीरसागर, व्हिडीओकॉनचे पंकज देशमुख आणि संतोष स्वामी, एल.जी.चे विनायक साबरे, पॅनासॉनिकचे बळवंत डीगारी, युरेका फोर्ब्सचे किरण पवार, सॅनसुईचे एस. विजय, अ‍ॅक्वाशुअरचे उत्तम शिंदे, आदी मान्यवरांच्या हस्ते हे लकी ड्रॉ काढण्यात आले. (प्रतिनिधी) दिवाळीआधीचअनोखी भेट‘लोकमत’च्या योजनेत बक्षीस लागल्याचे समजल्यानंतर विनोद भोकरे कमालीचे आनंदित झाले. कुंभोज (ता. हातकणंगले) येथे ते घड्याळ विक्री-दुरुस्तीचा व्यवसाय करतात. वडिलांनी हट्टाने गेल्या तीन वर्षांपासून ‘लोकमत’ घरी सुरू केला. यंदा ‘लोकमत’ व ‘रॉयल ब्ल्यू’मुळे आमच्या आनंदात भर पडली. या बक्षिसामुळे आमच्यासारख्यांच्या सामान्य कुटुंबात दिवाळीच्या आधीच दिवाळी झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. लोकमत दसरा ड्रॉचे विजेते :दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस ९,९९९ रुपयांच्या सोन्याचे मानकरी : चंद्रकांत पाटील (कुपन क्र. १८९४, सुभाष फोटो).तिसऱ्या क्रमांकाच्या वॉटर प्युरिफायर बक्षिसाचे मानकरी (२ नग) : मुस्कान मकानदार (कुपन क्र. १७०२१, वेंकटेश्वरा गारमेंट), केतन मिरजकर (कुपन क्र. १९४३६, नॉव्हेल होम अ‍ॅप्लायन्सेस). चौथ्या क्रमांकाच्या होम थिएटर बक्षिसाचे मानकरी (२ नग) : संजय नागदेवंडे (कुपन क्र. २४६१, चिपडे सराफ), स्वाती मालंदरकर (कुपन क्र. १०७४४, रती कलेक्शन).पाचव्या क्रमांकाच्या मायक्रो ओव्हन बक्षिसाचे मानकरी (३ नग) : मोहसीन जामदार (कुपन क्र. १३७२, राजाकाका ई मॉल), तानाजी चोपडे (कुपन क्र. ८०६२, लकी फर्निचर), स्वाती पाटील (कुपन क्र. ७८४७, पॉप्युलर अ‍ॅग्रिकल्चरल).सहाव्या क्रमांकाच्या डिजिटल कॅमेरे (३ नग) बक्षिसाचे मानकरी : हृषिकेश देशपांडे (कुपन क्र. ६८०९, एस. इलेक्ट्रॉनिक्स), संतोष काटे (कुपन क्र. १३१४, राजाकाका ई-मॉल), सागर सुईकर (कुपन क्र. १९१६०, नॉव्हेल होम अ‍ॅप्लायन्सेस) सातव्या क्रमांकाचे ‘इंडक्शन कुकर’ बक्षिसाचे मानकरी : कृष्णा संकपाळ (कुपन क्र. १३८९, राजाकाका ई-मॉल) आठव्या क्रमांकाच्या मोबाईल (५ नग) बक्षिसाचे मानकरी : वैभव पाटील (कुपन क्र. २५०९, बालाजी कलेक्शन), आशितोष जोशी (कुपन क्र. ३२८२, महेंद्र ज्वेलर्स), प्रिया पाटील (कुपन क्र. १५२९, रॉयल ब्ल्यू ), विलास खबाडे (कुपन क्र. ७९३०, रॉयल ब्ल्यू), केतन पाटील (कुपन क्र. १४५३, रॉयल ब्ल्यू ) नववे बक्षीस ‘इस्त्री’ बक्षिसाचे मानकरी (नग १०) : इलियास मोमीन (कुपन क्र. २२४२, चिपडे सराफ), श्वेता पाटील (कुपन क्र. २७३३, बालाजी कलेक्शन), राजाराम डोईफोडे (कुपन क्र. १०१३२, बुर्गे इलेक्ट्रॉनिक्स), संभाजी शिंदे (कुपन क्र. ८८१९, डायमंड इलेक्ट्रॉनिक्स), कौस्तुभ कोळेकर (कुपन क्र. १३८८, राजाकाका ई-मॉल), अमर वंशे (कुपन क्र. १५५१५, व्यंकटेश्वरा गारमेंट), सुभाष मोरे (कुपन क्र. ७०८८, जयनाथ असोसिएटस), शीतल बारस्कर (कुपन क्र. ३३८०, महेंद्र ज्वेलर्स), सुवर्णा खन्नूर (कुपन क्र. २४७१, चिपडे सराफ), योगेश आळतेकर (कुपन क्र. १८७८, सुभाष फोटो).बक्षीस वितरण सोमवारपासूनबक्षीस विजेत्यांनी आपली बक्षिसे लकी ड्रॉ कुपन स्थळप्रत व ओळखपत्र दाखवून लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी कोल्हापूर येथून सोमवार (दि. २ नोव्हेंबर)पासून १५ दिवसांच्या आत सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत घेऊन जावीत. उत्तेजनार्थ बक्षीस विजेत्यांची नावे उद्या, रविवारच्या अंकात प्रसिद्ध करण्यात येतील.