शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमसिंह घाटगे यांचे स्मारक उभारणार

By admin | Updated: September 26, 2015 00:59 IST

शाहू साखर कारखाना सभा : समरजितसिंह घाटगे यांचा निश्चय

कागल : स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांचे उचित स्मारक साखर कारखान्याच्यावतीने उभे करावे, अशा सूचना असंख्य सभासदांनी केल्या आहेत. स्वत: राजेसाहेबांनी छ. शाहू ग्रुपच्या माध्यमातून राजर्षी शाहूंचे जिवंत स्मारक उभे केले. त्याच पद्धतीने प्रत्यक्ष कार्यातून पिढ्यान्पिढ्या उपयोगी आणि प्रेरणादायी ठरेल, असे विक्रमसिंह राजेंचे स्मारक उभे करूया, असे प्रतिपादन छ. शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. कारखान्याच्या ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. सभेत घाटगे यांनी साखर निर्यातीस परवानगी दिल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन करून निर्यातीसाठी वाहतूक अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली. कारखाना लवकरच ३0 हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल प्र्रकल्प उभा करणार असल्याचे जाहीर केले. सभेत ज्येष्ठ संचालक आमदार वीरकुमार पाटील, उपाध्यक्ष एस. के. मगदूम, श्रीमंत वीरेंद्रसिंह घाटगे, सर्व संचालक व सभासद उपस्थित होते.यावेळी समरजितसिंह घाटगे म्हणाले, ज्या तत्त्वांच्यावर राजेसाहेबांनी साखर कारखाना चालवित तेच धोरण पुढे सुरू आहे. सध्या साखर उद्योगास अडचणी स्ुरूआहेत. मात्र, शाहू साखर कारखान्याच्या सभासदांच्या पाठबळावर व अडचणींचा काळ परतवून लावू.विक्रमसिंहराजेंच्या नेतृत्वाखाली कारखान्याने यापूर्वी एफ.आर.पी.पेक्षा जास्त उसदर दिला आहे. आणि राखीव निधीही निर्माण केला. त्यामुळे आर्थिक नियोजनात आपला कारखाना भक्कम उभा आहे. आॅक्टोबर २0१५ मध्ये पुढील हंगाम सुरू करण्याचा मानस आहे. मात्र, सध्याचे साखरंचे दर पाहता एफ.आर.पी.ची रक्कम टप्प्याटप्प्यांने द्यावी लागणार आहे. देशातील ४0 लाख टन साखर निर्यात झाली, तर साखरेला दर येऊन उसाच्या दराला फायदा होईल. मात्र, परदेशातही आपल्यापेक्षा थोडे दर कमी असल्याने कें द्र सरकारने निर्यातीसाठी वाहतूक अनुदान द्यावे. उपाध्यक्ष एस. के. मगदूम यांनी स्वागत, तर विषय पत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक विजय औतोड यांनी केले. प्रश्नोत्तरांचे वाचन सचिव एस. ए. कांबळे यांनी, तर अमरसिंह घोरपडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)एफ.आर.पी. टप्प्याटप्प्यानेसर्वसाधारण सभेत अध्यक्ष समरजित घाटगे यांनी येणाऱ्या ऊस गळीत हंगामातील आर्थिक अडचणी मांडल्या. त्यांच्या संदर्भाने सभासद दत्तात्रय चव्हाण यांनी शाहू साखर कारखाना शेतकऱ्यांना पूर्ण एफ.आर.पी. देणार यात शंका नाही. मात्र, ही एफ.आर.पी. टप्प्याटप्प्यांने दिली, तर सभासदांची हरकत नाही, असा ठराव मांडला. या ठरावास सभासदांकडून टाळ्यांचा कडकडाटात मंजुरी दिली.राजेंशिवाय पहिली सभाकोणत्याही पोलीस बंदोबस्तशिवाय गेली ३७ वर्षे कारखान्याची वार्षीक सर्वसाधारण सभा होत आली आहे. सभेच्या केंद्रस्थानी अर्थातच विक्रमसिंह घाटगे असत. त्यांच्या निधनांनंतर ही ३८ वी वार्षिक सभा शुक्रवारी होत होती. ही राजेंच्याशिवाय पहिलीच सभा. त्यामुळे नूतन अध्यक्ष समरजितसिंह घाटगेंना ऐकण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.