शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

चित्रपटसृष्टीला गतवैभव आणणार-- विजय पाटकर

By admin | Updated: April 20, 2016 00:45 IST

चित्रपटांची वितरण व्यवस्था सुरू करण्याचा मानस -मराठी चित्रपट महामंडळ निवडणूक

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसा प्रचार शिगेला पोहोचू लागला आहे. यात एकूण नऊ पॅनेलसह १२० उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. त्यापैकी विद्यमान अध्यक्ष विजय पाटकर यांनी आपल्या ‘क्रियाशील पॅनेल’ची भूमिका ‘लोकमत’शी बोलताना जाहीर केली. प्रश्न : टॉलिवूडच्या धर्तीवर सर्वत्र मराठी चित्रपटसृष्टीला चांगले दिवस कधी येणार ?उत्तर : मी आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा कामाला अधिक महत्त्व देतो. त्यामुळे मी मराठी चित्रपट सातासमुद्रापार कसा जाईल याकडे लक्ष दिले आहे. त्यासाठी निलकांती पाटेकर यांच्या सहयोगाने डेस्क सुरूकेला आहे. एकदा जागतिक पातळीवर आपले चित्रपट जाऊ लागले की, आपोआप इंटरनॅशनल ब्रँड तयार होईल. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीला निश्चित येत्या काळात चांगले दिवस येतील. नाशिक येथेही चित्रनगरी उभी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चित्रपटांची वितरण व्यवस्था सुरू करण्याचा मानस आपल्या पुढील कारकिर्दीत आहे. प्रश्न : महामंडळाचे अध्यक्ष म्हणून सभासदांच्या हिताकरिता काय भूमिका घेतली?उत्तर : महामंडळाच्या कारकिर्दीत संकेतस्थळ निर्माण केले. सभासदांकरिता आरोग्य शिबिर घेतले. महामंडळाचे सभासद होतानाच्या जाचक अटी रद्द केल्या. त्यामुळे संख्याही वाढली. महामंडळाचे ओळखपत्र हिंदी चित्रपटसृष्टीत चालावे म्हणून प्रयत्न केले. त्यामुळे रोजगारही मिळू शकेल. वरिष्ठ सभासदांना पेन्शनही माझ्याच कारकिर्दीत सुरू केली. सभासदांकरिता हेल्थ इन्शुरन्स, २४ तास हेल्पलाईन नंबरची सुविधाही केली. मी यापुढे निवडून येवो अगर न येवो; मात्र सातत्याने मराठी चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी कार्यरत राहणार आहे. प्रश्न : चित्रनगरीसाठी काय प्रयत्न केले?उत्तर : कोल्हापूर ही मराठी चित्रपटसृष्टीची पंढरी आहे. त्यामुळे या पंढरीत अनेक दिग्गज कलाकार निर्माण झाले. त्यामुळे यापुढेही ही परंपरा कायम राहावी, याकरिता सरकार दरबारी कोल्हापूरचे वैभव असणाऱ्या चित्रनगरीला पुन्हा मूळ रुळावर आणण्यासाठी प्रयत्न केले. माझ्या कारकिर्दीत चित्रनगरीतील काही कामांचा पाठपुरावाही केला आहे. प्रश्न : मराठी चित्रपट निर्मात्यांना अनुदान सुलभ होण्याकरिता काय प्रयत्न करणार?उत्तर : मला सभासदांनी पुन्हा संधी दिल्यास चित्रपटसृष्टीतील शेवटच्या घटकाच्या समस्याही जाणून घेऊन त्यांचे निराकरण करेन. याशिवाय राज्य शासनाच्या अनुदान समितीमध्ये जास्तीत जास्त सदस्य हे महामंडळाचेच असावेत, याकरिता विशेष प्रयत्न करीन.प्रश्न : आपल्या क्रियाशील पॅनेलमध्ये कोणाला संधी दिली आहे?उत्तर : आपल्या पॅनेलमध्ये समृद्धी पोरे, प्रकाश जाधव, विजय राणे, संतोष भांगरे, राजेश देशपांडे, सतीश बिडकर, बाबासाहेब लाड, संजीव नाईक, अमोद दोषी, अनिल निकम, निवेदिता सराफ, रत्नकांत जगताप, बाळकृष्ण बारामती (कामगार) यांना संधी दिली आहे. (प्रतिनिधी)