शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - कोल्हापूरचा शाही दसरा उत्साहात

By admin | Updated: October 11, 2016 20:35 IST

हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या कोल्हापूरवासीयांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा असा शाही दसरा सोहळा मंगळवारी संपन्न झाला.

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. 11 -  आपला विजयोत्सव साजरा करण्यासाठी भालदार-चोपदार..घोडेस्वार अशा शाही लव्याजम्यानिशी आलेली करवीर निवासिनी अंबाबाई, तुळजाभवानी, कोल्हापूर संस्थानचे श्रीमंत शाहू महाराज, युवराज संभाजीराजे,महाराजकुमार मालोजीराजे, यौवराज यांची उपस्थिती, आरतीनंतर बंदुकीच्या फैरी झाडून देवीला दिलेली सलामी, आकर्षक आतषबाजी आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या कोल्हापूरवासीयांच्या डोळ््याचे पारणे फेडणारा असा शाहीदसरा सोहळा मंगळवारी संपन्न झाला. अंबाबाई, तुळजाभवानीची ईश्वरी सत्ता आणि संस्थान सत्तेच्या संगमाने झालेल्या या शाही सीमोल्लंघन सोहळ््याला ह्यसोनं घ्या सोन्यासारखं राहाह्ण अशा शुभेच्छा देत नागरिकांनी सोने लुटले.आठ दिवस महिषासूरशी घनघोर युद्ध करून विजय मिळवलेल्या दुर्गेच्या विजयोत्सवाचा परमोच्च क्षण म्हणजे सीमोल्लंघन सोहळा. यानिमित्त करवीर निवासिनी अंबाबाईची रथारूढ पूजा बांधण्यात आली. आपला विजयोत्सव साजराकरण्यासाठी देवी रथात बसून जाते, असा यामागचा अन्वयार्थ आहे. कोल्हापूरचा शाही दसरा म्हणजे देशवासीयांचे आकर्षण. संस्थान खालसा झाले असले तरी येथील संस्थानकालीन परंपरा आजही सुरू आहेत, त्यातला महत्त्वाचा उत्सवम्हणजे करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा शारदीय नवरात्रोत्सव. संध्याकाळी पाच वाजता अंबाबाईची आणि तुळजाभवानी देवीच्या पालख्या आपल्या लव्याजम्यानिशी दसरा चौकाकडे प्रस्थान झाल्या. दरम्यान, श्रीमंत शाहू महाराज, युवराज संभाजीराजे, महाराजकुमार मालोजीराजे, बाळराजे शहाजीराजे, यौवराज यशराजे यांचे मेबॅक कारमधून सोहळास्थळी आगमन झाले. सोहळास्थळी पोलीस बँडने देवीला मानवंदना दिली. शाहू महाराजांच्या हस्ते देवीची आरती झाल्यानंतर सहा वाजून बारा मिनिटांनी बंदुकीच्या फैरी झाडून या शाही सोहळ््याला सलामी देण्यात आली. त्यानंतर नागरिकांनी सोने लुटले.छत्रपतींनी मेबॅक कारमध्ये उभे राहून कोल्हापूरकरांकडून सोने स्वीकारले. त्यानंतर जुना राजवाड्यात दसऱ्याचा दरबार भरविण्यात आला.अंबाबाईची पालखी आपल्या लव्याजम्यानिशी सिद्धार्थनगर, पंचगंगा नदी घाट, पापाची तिकटी, गुजरीमार्गे रात्री मंदिरात परतली. रात्री पालखी सोहळा संपन्न झाला.

>