शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

‘दळवीज’चा हिरा हरपला ज्येष्ठ चित्रकार जयसिंगराव दळवी यांचे निधन

By admin | Updated: May 18, 2014 00:47 IST

कोल्हापूर : येथील ज्येष्ठ चित्रकार व शिल्पकार आणि दळवीज आर्टस इन्स्टिट्यूट या कलासंस्थेचे माजी प्राचार्य जयसिंगराव दत्तोबा दळवी (वय ९२) यांचे काल,

कोल्हापूर : येथील ज्येष्ठ चित्रकार व शिल्पकार आणि दळवीज आर्टस इन्स्टिट्यूट या कलासंस्थेचे माजी प्राचार्य जयसिंगराव दत्तोबा दळवी (वय ९२) यांचे काल, शुक्रवारी रात्री निधन झाले. त्यांच्यावर आज, शनिवारी सकाळी पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात प्राचार्य अजय दळवी यांच्यासह तीन मुलगे व एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. बिहारचे राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील व माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर यांचे ते मामा होत. दळवी यांना गेल्या दोन-तीन दिवसांपासून थकवा जाणवू लागल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. एकशे साठ वर्षांहून अधिक वर्षांची कलापरंपरा असणारे कोल्हापूर शहरामध्ये राजर्षी शाहूंच्या विचारांचा वारसा आपल्या कृतीतून पुढे घेऊन जाणारी मोजकीच घराणी आज अस्तित्वात आहेत. त्यातील ‘दळवी’ घराण्याचा उल्लेख करावा लागेल. स्वातंत्र्यपूर्व काळामधील जे. जे. स्कूल आॅफ आर्टनंतर दुसरी म्हणजेच दळवीज आर्टस इन्स्टिट्यूट ही कलासंस्था. वास्तविक, या संस्थेमध्ये बहुजन समाजातील कष्टकरी वर्गाच्या मुलांना कलाशिक्षण देण्याचे कार्य हे खरोखरच क्रांतिकारी पाऊल होते. त्याकाळी फक्त मुंबईमध्ये व धनिकांसाठी असणारे कलाक्षेत्र दळवी यांच्यामुळे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले. राजर्षी शाहूंचे दरबारी चित्रकार दत्तोबा दळवी यांचे जयसिंगराव हे सुपुत्र. त्यामुळे कलेचा वारसा वडिलांकडूनच मिळाला. शरीर थकले तरी अखेरपर्यंत त्यांचा उत्साह तरुणांना लाजवील असा होता. मोठ्या झाडाच्या सावलीमुळे लहान झाडे खुजी होतात; असे म्हटले जाते परंतु जयसिंगराव यांनी ज्ञानार्जनाचा वारसा पुढच्या पिढीकडे सोपविला. हा वारसा सध्या प्राचार्य अजय दळवी सक्षमपणे सांभाळत आहेत. त्यांच्या रूपाने आज दळवी यांची तिसरी पिढी कलापताका पुढे नेत आहे. (प्रतिनिधी)