शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पंदारे यांचे निधन

By admin | Updated: September 15, 2014 23:28 IST

प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे विद्यमान अध्यक्ष

कोल्हापूर : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे विद्यमान अध्यक्ष, राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंटस् को-आॅपरेटिव्ह बँकेचे माजी अध्यक्ष वसंतराव कृष्णराव पंदारे यांचे ९१ व्या वर्षी वृद्धापकाळाने खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान सकाळी सात वाजता निधन झाले. पंदारे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या संघर्षमय जीवनाची सुरुवात केली होती. वडील कृष्णराव हे गवंडी काम करीत होते. अशा गरीब कुटुंबात जन्मलेल्या वसंतराव यांनी तरुणपणात १९४२ च्या ‘चलेजाव’ या लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. पुढे महसूल विभागात कार्यरत असताना १९७६ साली महसूल विभागामध्ये मोठे आंदोलन झाले. या आंदोलनाचे नेतृत्व करीत शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून दिला. त्यांचा अनेक शासकीय, सामाजिक, शैक्षणिक व सहकारी संस्थांशी निकटचा संबध होता. शिवाजी पेठेचे आर्थिक केंद्र असलेल्या बलभीम सहकारी बँक आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट बँकेशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध होता. शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग या संस्थेचे संस्थापक सदस्य म्हणून आजतागायत त्यांचा क्रियाशीलपणे सहभाग होता. ते संस्थेचे विद्यमान अध्यक्ष होते. याचबरोबर शिवाजी तरुण मंडळाचे ते संस्थापक सदस्य व विद्यमान सदस्य होते. कोल्हापूर जिल्ह्यामधील शासकीय कर्मचारी संघटनेच्या चळवळीमधील एक कृतीशील नेतृत्व म्हणून वसंतराव पंदारे यांची संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ओळख निर्माण झाली होती. राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हंटस् बँकेचे विद्यमान अध्यक्ष रवींद्र पंदारे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात ज्येष्ठ चिरंजीव रवींद्र, राजेंद्र, शैलेंद्र व कन्या शैलजा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा पार्थिवावर रविवारी दुपारी दोन वाजता पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.