शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

‘वीरशैव’ बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:20 IST

कोल्हापूर : वीरशैव को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी अमर शिंदे यांनी गुरुवारी जाहीर केला. बँकेसाठी ६ जानेवारीपासून ...

कोल्हापूर : वीरशैव को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी अमर शिंदे यांनी गुरुवारी जाहीर केला. बँकेसाठी ६ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. मागील निवडणुकीत काही गटातच निवडणूक झाली होती. यावेळेला निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सत्तारूढ गटाचा आहे.

महाराष्ट्र व कर्नाटक कार्यक्षेत्र असलेल्या बहुराज्यीय वीरशैव बँकेची निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. तीस शाखांच्या माध्यमातून बँकेचा १५०० कोटींचा व्यवहार असून तब्बल ४ कोटी नफा आहे. बँकेची मागील निवडणूक बिनविरोध करण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न झाला. मात्र, १९ जागांसाठी २६ अर्ज राहिल्याने काही गटांसाठी निवडणूक लागली होती. यामध्ये सत्तारूढ गटाने एकतर्फी विजयी खेचून आणला होता.

आता निवडणूक होत असून गुरुवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. मतदार यादीवर ४ जानेवारीपर्यंत हरकती घेता येणार असून ५ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच ६ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे.

बहुराज्यीय संस्था नोंदणी कायद्यांतर्गत एकूण जागेएवढेच अर्ज आले तर बँकेची सर्वसाधारण सभाच संचालक मंडळास मान्यता देते. बँकेची सर्वसाधारण सभा २५ जानेवारीला आहे. जागेएवढेच अर्ज आले नाहीतर ७ फेब्रुवारी रोजी मतदान आणि ९ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

दृष्टीक्षेपात वीरशैव बँक-

कार्यक्षेत्र : महाराष्ट्र, कर्नाटक

शाखा : ३०

सभासद : २२ हजार

ठेवी : ९२७ कोटी

कर्जे : ५७२ कोटी

नफा : ४ कोटी

कोट-

गेली १५ ते २० वर्षे सभासदांनी विश्वास टाकत आमच्यावर जबाबदारी सोपविली. त्यास पात्र राहून अतिशय पारदर्शक कारभार केला. यावेळची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.

- नानासाहेब नष्टे ( ज्येष्ठ संचालक, वीरशैव बँक)

- राजाराम लोंढे