शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वारणा नदी आमच्याच मालकीची

By admin | Updated: June 5, 2017 01:16 IST

वारणा नदी आमच्याच मालकीची

लोकमत न्यूज नेटवर्कदानोळी : वारणा नदी ही आमच्याच मालकीची असून, इचलकरंजीला पाण्याचा एकही थेंब न देण्याच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. वारणा नदीकाठावरील प्रत्येक गावात बैठक घेऊन या योजनेचे गांभीर्य पटवून देणार आहे. असून, आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशारा वारणा कृती समितीने येथे दिला. आमदार सुरेश हाळवणकर यांनी गावातून नदी गेली म्हणजे मालक झाला काय या वक्तव्यास प्रत्युत्तर म्हणून रविवारी दानोळी येथे वारणा बचाव कृती समितीची बैठक झाली. या बैठकीत कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भूमिका जाहीर केली. यावेळी समितीचे कार्याध्यक्ष सर्जेराव शिंदे म्हणाले, नदी काठावरील गावांनी गावठाणची जमीन आणि शेतकऱ्यांनी वडिलार्जित जमिनी देऊन धरणग्रस्तांचे पुनर्वसन केले आहे. त्यामुळे वारणा नदी आमच्याच मालकीची आहे. वारणा बचाव कृती समितीचे अध्यक्ष महादेव धनवडे म्हणाले, ही योजना अनैसर्गिक असून, ती रद्द होईपर्यंत लढणार असून, त्यासाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील वारणा नदीकाठावरील प्रत्येक गावात बैठक घेऊन या योजनेचे गांभीर्य पटवून देणार असून, आंदोलन आणखी तीव्र करणार आहे. याची सुरुवात आज, सोमवारपासून कोथळी, कवठेसार, हिंगणगाव, कुंभोज गावांत बैठकी घेणार आहे. सध्या शहरास पाणीपुरवठा होत असलेल्या पंचगंगा नदी आणि कृष्णा नदीस एकूण आठ नद्या मिळाल्या आहेत. अशा आठ नद्यांचे पाणी घेऊन सुद्धा थेट वारणेतून पाणी कशासाठी यासह सध्याची पाणीपुरवठा योजना कालबाह्य झाल्याचे सांगत असून, ती मुदतीपूर्व कालबाह्य झालीच कशी? यापूर्वी कालव्यामुळे फार मोठे नुकसान होणार असे सांगून कालवाही नको व वारणेचे पाणीही नको, अशी भूमिका इचलकरंजी शहराने घेतली होती. आता ते कोणत्या हक्काने पाणी मागतात, असे अनुत्तरित मुद्दे समितीचे उपाध्यक्ष केशव राऊत, बापूसो दळवी, मानाजी भोसले यांनी मांडले.दिवसाकाठी सोळा तासांचा पाणी उपसा परवाना आहे. पण, सध्या केवळ आठ तास वीज मिळते. भविष्यात महावितरणला अच्छे दिन आले तर सोळा तास पाणी उपसा करण्यात येईल. त्यावेळी आमच्या कोरड्या जमिनीस आम्हालाच पाणी दुसरीकडून आणावे लागेल, असे मत समितीने मांडले.बैठकीस उपसरपंच गब्रू गावडे, सुरेश कांबळे, संदीप हवालदार, सतीश मलमे, जंबू सकाप्पा, गुंडू दळवी, प्रवीण पवार, सुरेश माणगावे, उमेश केकले, सातगोंडा पाराज, अशोक आनंदा, धन्यकुमार भोसले, उदय होगले, रावसो खिचडे, प्रवीण पोवार, वसंत पिसे, अरुण होगले, दत्ता राजमाने, आदी उपस्थित होते.हाळवणकरांना राजकीय लाभमंत्री असताना प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी शहरास वारणेतून पाणी आणू असा विचार मांडला होता. पण, त्यावेळी हाळवणकरांनी काळम्मावाडीतून थेट पाईपलाईन करण्याचा प्रस्ताव मांडला होता. आता हाळवणकर आमदार असताना तेच पुन्हा वारणेतून पाणी नेण्यासाठी आक्रमक झाले आहेत. यावरून आमदार हाळवणकरांचे राजकीय लाभ दिसून येत आहेत.