शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

सरनोबत यांच्यामुळेच रखडले विविध प्रकल्प

By admin | Updated: January 2, 2015 00:21 IST

सचिन चव्हाण : प्रशासनाविरुद्ध लढणार

कोल्हापूर : स्थायी समिती सभापतिपदाच्या एक वर्षाच्या कारकिर्दीत थेट पाईपलाईन, ‘केएमटी’ची १०४ नव्या बसेसची खरेदी, कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया केंद्र, १५३ कर्मचाऱ्यांना कायम करणे, आदी योजना मार्गी लावल्याचे समाधान आहे. मात्र, एलईडी स्ट्रीट लाईटसह मल्टिलेव्हल कार पार्किंग, नवीन प्रशासकीय इमारत, रंकाळा संवर्धन, पर्यटन विकास हे विषय निव्वळ प्रशासकीय ढिलेपणामुळे मागे राहिले. या सर्वांसाठी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत हेच जबाबदार आहेत, असा आरोप स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांनी आज, गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.सचिन चव्हाण यांचा स्थायी समिती सभापतीचा कार्यकाल ३१ डिसेंबरला संपला. नवीन सभापतीची निवड उद्या, शुक्रवारी होत आहे. तत्पूर्वी, चव्हाण यांनी एक वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. प्रशासकीय ढीलेपणामुळे अनेक प्रकल्प कागदावरच राहिल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.चव्हाण म्हणाले, ‘केएमटी’ वाचविण्यासाठी एक कोटी रुपयांचे अनुदान महापालिकेच्या बजेटमधून दिले. १०४ बसेस आल्यानंतरही वडापवर ठोस कारवाईशिवाय ‘केएमटी’ला ऊर्जितावस्था अशक्य आहे. ‘केएमटी’ फायद्यात यावी, यासाठी यापुढेही प्रयत्न करणार आहे. रंकाळा तलाव संवर्धन, पर्यटन विकास, पार्किंग व्यवस्था, नवीन अद्यायावत शासकीय इमारत, आदी मोठे प्रकल्प नेत्रदीप सरनोबत यांच्या ढिसाळ कारभारामुळेच रेंगाळले आहेत. स्थायी सभापतिपदाच्या कारकिर्दीबाबत अत्यंत समाधानी असून भविष्यात पक्ष व नेते जी जबाबदारी देतील ती पूर्ण करू, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. (प्रतिनिधी)चार वर्षातील प्रकल्प सांगा अन् बक्षीस मिळवाअभियंता सरनोबत यांनी गेल्या चार वर्षांत मार्गी लावलेला एक प्रकल्प सांगा, अन् बक्षीस मिळवा, असे आवाहनही सचिन चव्हाण यांनी केले.