शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षेसाठी हेल्मेट वापरा : दराडे

By admin | Updated: February 27, 2015 00:19 IST

‘लोकमत’च्या कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे वितरण

कोल्हापूर : वाहन चालवतांना हेल्मेट, सिटबेल्ट वापरल्यास अपघातात इजा होण्याचे प्रमाण ८५ टक्के कमी असते. त्यामुळे कायदा म्हणून नव्हे, तर आपल्या जिवाच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट, सिटबेल्टचा वापर करा, असे आवाहन कोल्हापूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांनी गुरुवारी केले. शिरोली एमआयडीसी कार्यालय येथे ‘लोकमत’च्या कर्मचाऱ्यांना हेल्मेट वितरणप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दराडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, व्यवस्थापक (मनुष्यबळ व प्रशासन) संतोष भोगशेट्टी उपस्थिती होते. यावेळी दराडे यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे वितरण झाले. दराडे म्हणाले, आपण बऱ्याच वेळा परदेशातील आणि भारतातील सुविधा यांच्यात तुलना करतो. मात्र, परदेशात नियम काटेकोरपणे पाळले जातात. आपण मात्र त्याकडे दुर्लक्ष करतो. आपणही शिस्त म्हणूून नियम पाळले पाहिजेत. कायदा असला तरी आपल्या सुरक्षेसाठी स्वयंशिस्त पाळून हेल्मेट, सिटबेल्ट वापरायला पाहिजे. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १९८५ साली ५७ हजार वाहने होती. २0१५ च्या सुरुवातीला ही संख्या नऊ लाख ७७ हजार झाली. दर महिन्याला यात सरासरी दहा हजार वाहनांची भर पडत आहे. या वाढत्या वाहनांच्या संख्येने अपघातांचेही प्रमाण वाढत आहे. त्यामुळे हेल्मेट, सिटबेल्ट वापरणे आवश्यक आहे. वाहन चालवताना नियमांचे पालन केल्याने २0१३ च्या तुलनेत यावर्षी अपघातातील मृतांचे प्रमाण काही अंशी घटल्याचेही त्यांनी सांगितले. रस्ता सुरक्षा सप्ताह जानेवारीपुरताच साजरा न करता येत्या मार्चपासून प्रत्येक तालुक्यात नियमांसंबंधी जागृती करणार असून ‘लोकमत’ने त्याला पाठबळ द्यावे, असे आवाहनही दराडे यांनी केले. सरव्यवस्थापक मकरंद देशमुख म्हणाले, ‘लोकमत’चे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापराचे आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद लाभला. सक्ती, कायदा म्हणून नव्हे, तर आपल्या घरी कोणीतरी वाट पाहत आहे याचे भान ठेवून हेल्मेट वापरायला हवे. संपादक वसंत भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले. व्यवस्थापक संतोष भोगशेट्टी यांनी प्रस्ताविक केल.