शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाईची प्रतिकृती मूर्तीच पूजेस वापरा

By admin | Updated: December 5, 2014 00:21 IST

पुरातत्त्व खात्याचा अहवाल; रासायनिक संरक्षण आवश्यक, पण वज्रलेप नकोच

कोल्हापूर : अंबाबाईच्या मूर्तीची दिवसेंदिवस झीज होत आहे. ती थांबविण्यासाठी मूर्तीला रासायनिक संरक्षण (केमिकल कॉन्झर्व्हेशन) करणे आवश्यक आहे. या मूर्तीस कोणत्याही कारणास्तव वज्रलेप करण्यात येऊ नये. तसेच देवीच्या मूर्तीची प्रतिकृती बनविण्यात येऊन तिचा दैनंदिन पूजेत वापर करण्यात यावा, असा अहवाल पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्यावतीने आज, गुरुवारी सादर करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व शासनाने २००२ साली अंबाबाईच्या मूर्तीला वज्रलेप करण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी वज्रलेप समिती स्थापन केली. मात्र, देवीची मूर्ती वज्रलेप पेलण्याच्या स्थितीत नसल्याने श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी याविरोधात न्यायालयात दावा दाखल केला होता. वर्षानुवर्षे यावर निर्णयच होत नाही, हे लक्षात आल्यानंतर अ‍ॅड. केदार मुनीश्वर यांनी सहा महिन्यांपूर्वी हे प्रकरण वैकल्पिक वाद निवारण केंद्राकडे वर्ग करण्यात यावे, अशी मागणी केली होती. ती मान्य होऊन हे प्रकरण त्या केंद्राकडे वर्ग करण्यात आले. त्यावर आज सुनावणी ठेवण्यात आली होती. सुनावणीस पुरातत्त्व खात्याचे अधिकारी विलास वहाणे उपस्थित होते. त्यांनी पुरातत्त्व खात्याचा अहवाल सादर केला.या अहवालात असे म्हटले आहे की, अंबाबाईची मूर्ती काळ्या पाषाणात बनविलेली आहे. या मूर्तीची मोठ्या प्रमाणात झीज झालेली आहे. शिवाय रोज त्यावर अलंकार व साडी नेसविण्याचे विधी होत असल्याने दिवसेंदिवस अधिकच झीज होत आहे. ती थांबविण्यासाठी मूर्तीचे रासायनिक संरक्षण करणे आवश्यक असून, हे काम भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण महासंचालनालयाच्या औरंगाबाद येथील रासायनिक शाखेकडून करून घेण्यात यावे. तसेच मूर्तीला वज्रलेप देण्यात येऊ नये, असे नमूद केले आहे. वज्रलेप निर्णयावर वज्रलेप समितीचा खोडा : श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांचा आरोपकरवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्तीच्या वज्रलेपावरील निर्णयात वज्रलेप समितीने खोडा घातला आहे. समितीतील सदस्यांनी वैकल्पिक वाद निवारण केंद्रात सुरू असलेल्या सुनावणीला अनुपस्थित राहून देवीबद्दल अनास्थाच दर्शविली आहे, असा आरोप श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी पत्रकार परिषदेद्वारे केला.अंबाबाईच्या मूर्तीच्या वज्रलेपाचा वाद सध्या वैकल्पिक वाद निवारण केंद्रात सुरू आहे. मात्र, आजवर झालेल्या सुनावणीस एकवेळ वगळता वज्रलेप समितीचा एकही प्रतिनिधी उपस्थित राहिला नाही. समितीचे सरकारी वकील अ‍ॅड. सुरेश कांबळे हे सुनावणीस उपस्थित राहण्यास टाळाटाळ करीत आहेत. दुसरीकडे, देवस्थानने वज्रलेप समितीच अस्तित्वात नसल्याचे पत्र सादर केले आहे. वास्तविक, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. नेवगी यांच्या निधनानंतर अध्यक्षपद जिल्हाधिकाऱ्यांकडे आले आहे. मध्यस्थांनादेखील प्रक्रिया पुढे चालविणे अवघड झाले आहे. केंद्राचे कामकाजच चालत नसल्याने उपस्थित राहणाऱ्या वादी-प्रतिवादींची कसलीही नोंद मध्यस्थांकडे होत नाही. सरकारी उदासीनतेमुळे एक महत्त्वाचा आणि भक्तांच्या जिव्हाळ्याचा निर्णय खोळंबला आहे. वज्रलेपाविरोधात यापूर्वी सादर झालेले अहवाल २००२ - श्री जगद्गुरू शंकराचार्र्य महासंस्थान, श्रृंगेरी या पीठाच्या शंकराचार्यांनी अंबाबाईची मूर्ती अतिप्राचीन आहे. यापूर्वीचा वज्रलेप परिणामकारक न झाल्याने पुन्हा वज्रलेप करणे युक्तिसंगत नाही, असे सांगितले आहे. २००२ : ज्येष्ठ भूगर्भतज्ज्ञ डॉ. एम. के. प्रभू यांनी दिलेल्या अहवालातही मूर्तीवर वज्रलेप म्हणजे तिच्यावर अतिरिक्त भार टाकण्यासारखे असून, तो पेलण्यास मूर्ती समर्थ नाही, असे म्हटले आहे. २००९ : पुण्याच्या ‘इरडॉस’ या संस्थेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालातही मूर्तीला वज्रलेप नको, तर तिचे केमिकल कॉन्झर्व्हेशन करण्यात यावे, असेच सांगितले आहे. २०१४ : ‘आर्कालॉजिकल सर्व्हे आॅफ इंडिया’चे निवृत्त अधिकारी महांगीराज व त्र्यंबके यांनी केमिकल कॉन्झर्व्हेशनचा सल्ला दिला आहे.४२०१४ : मूर्ती अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनीही मूर्ती वज्रलेप पेलण्यास समर्थ नाही, असे नमूद केले.