शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यालयात अद्ययावत ‘सायबर लॅब’

By admin | Updated: August 17, 2016 00:05 IST

पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन : ६६ लाख रुपये खर्चून यंत्रणा

कोल्हापूर : आजच्या स्वातंत्र्यदिनी राज्यात ४४ ठिकाणी सायबर लॅब सुरू होत असून, अनेक सायबर गुन्हे उघडकीस येऊन गुन्हेगारांना जरब बसेल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी (दि. १५) व्यक्त केला. कोल्हापूर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने ६६ लाख रुपये खर्च करून पोलिस मुख्यालयात कार्यान्वित केलेल्या अद्ययावत सायबर लॅबच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, आदी मान्यवर उपस्थित होते.जिल्हास्तरावर अद्ययावत सायबर लॅब कार्यान्वित झाल्याने अनेक सायबर गुन्हे तत्काळ उघडकीस आणणे शक्य होणार असल्याचे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, वाढत्या सायबर गुन्हेगारीला लगाम घालण्याचे काम सायबर लॅबद्वारे होईल. सायबर लॅबच्या माध्यमातून हार्ड डिस्क फॉरेन्सिक त्याचप्रमाणे मोबाईल फॉरेन्सिक तपास सहज शक्य होणार आहे. जिल्हा स्तरावर सायबर लॅब ही काळाची गरज असून यापुढील काळात हा उपक्रम अधिक प्रभावी आणि परिणामकारकपणे राबवावा. पोलिस दलाची संख्यात्मक वाढ करण्याबरोबरच त्यांना अत्याधुनिक सुविधा आणि साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासही राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे.विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, ‘कोल्हापूर परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांत तीन कोटी रुपये खर्चून सायबर लॅब उभारण्यात आल्या आहेत. सायबर लॅब प्रकल्पाबरोबरच सायबर गुन्ह्यांविषयी लोकांना विशेषत: शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना माहिती दिली जाणार आहे.’ पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. गडहिंग्लजचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिनेश बारी यांनी आभार मानले. समारंभास वरिष्ठ पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच मान्यवर व नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)मुख्यालयात अद्ययावत ‘सायबर लॅब’पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन : ६६ लाख रुपये खर्चून यंत्रणाकोल्हापूर : आजच्या स्वातंत्र्यदिनी राज्यात ४४ ठिकाणी सायबर लॅब सुरू होत असून, अनेक सायबर गुन्हे उघडकीस येऊन गुन्हेगारांना जरब बसेल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी (दि. १५) व्यक्त केला. कोल्हापूर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने ६६ लाख रुपये खर्च करून पोलिस मुख्यालयात कार्यान्वित केलेल्या अद्ययावत सायबर लॅबच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, आदी मान्यवर उपस्थित होते.जिल्हास्तरावर अद्ययावत सायबर लॅब कार्यान्वित झाल्याने अनेक सायबर गुन्हे तत्काळ उघडकीस आणणे शक्य होणार असल्याचे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, वाढत्या सायबर गुन्हेगारीला लगाम घालण्याचे काम सायबर लॅबद्वारे होईल. सायबर लॅबच्या माध्यमातून हार्ड डिस्क फॉरेन्सिक त्याचप्रमाणे मोबाईल फॉरेन्सिक तपास सहज शक्य होणार आहे. जिल्हा स्तरावर सायबर लॅब ही काळाची गरज असून यापुढील काळात हा उपक्रम अधिक प्रभावी आणि परिणामकारकपणे राबवावा. पोलिस दलाची संख्यात्मक वाढ करण्याबरोबरच त्यांना अत्याधुनिक सुविधा आणि साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासही राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे.विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, ‘कोल्हापूर परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांत तीन कोटी रुपये खर्चून सायबर लॅब उभारण्यात आल्या आहेत. सायबर लॅब प्रकल्पाबरोबरच सायबर गुन्ह्यांविषयी लोकांना विशेषत: शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना माहिती दिली जाणार आहे.’ पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. गडहिंग्लजचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिनेश बारी यांनी आभार मानले. समारंभास वरिष्ठ पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच मान्यवर व नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)