शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तोपर्यंत वीज कनेक्शन तोडल्यास गाठ आमच्याशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:24 IST

कोल्हापूर : लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिलांसंबधी राज्य सरकारकडून निर्णय होईंपर्यंत कोणत्याही परिस्थितीत वीज कनेक्शन तोडू नयेत, अन्यथा गाठ ...

कोल्हापूर : लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिलांसंबधी राज्य सरकारकडून निर्णय होईंपर्यंत कोणत्याही परिस्थितीत वीज कनेक्शन तोडू नयेत, अन्यथा गाठ आमच्याशी असेल, असा इशारा वीज बिल वाचवा कृती समितीने बुधवारी ‘महावितरण’ला दिला.

‘महावितरण’चे कर्मचारी घरोघरी जाऊन थकीत वीज बिलांच्या वसुलीचा तगादा लावत आहे. वीज कनेक्शन कट करण्याची धमकीही देत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य इरिगेशन फेडरेशन व कृती समितीने ‘महावितरण’चे मुख्य अभियंता सुधाकर निर्मळे यांची भेट घेऊन त्यांना सरकारचा निर्णय होईपर्यंत थांबा, असे सांगितले. यावर निर्मळे यांनीही याबाबत सरकारकडून परवानगी घेतो, असे सांगत आदेश येईपर्यंत कोणाचेही कनेक्शन कट होणार नाहीत, अशी ग्वाही दिली.

यावेळी प्रताप होगाडे, बाबासाहेब पाटील-भुयेकर, निवासराव साळोखे, विक्रांत पाटील किणीकर, बाबा पार्टे, आर. के. पाटील, चंद्रकांत पाटील, बाबासाहेब देवकर, महादेव सुतार, जावेद मोमीन, मारुती पाटील उपस्थित होते.

चौकट ०१

बिले थकल्याने महावितरण आर्थिक अडचणीत असल्याने थोडे सहकार्य करा, असे आवाहनही निर्मळे यांनी केले.

यावर प्रताप होगाडे यांनी मार्च ते सप्टेंबर या काळातील बिल सोडून प्रत्येक ग्राहकाचे १ ऑक्टोबरपासून वीज वापराचे वीज बिल तयार करून द्यावे तेथून पुढील वीज बिल आम्ही भरू, अशी भूमिका घेतली.

फोटो ३०१२२०२०-कोल-महावितरण

फोटो ओळ : ‘महावितरण’कडून सुरू असलेल्या वीज बिल वसुलीच्या सक्तीच्या विरोधात बुधवारी वीज बिल कृती समितीने ‘महावितरण’चे मुख्य अभियंता सुधाकर निर्मळे यांना निवेदन देऊन वसुली थांबविण्याची मागणी केली.