शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजी वस्त्रोद्योगात अस्वस्थता

By admin | Updated: September 20, 2014 00:09 IST

कापड बाजारातील आर्थिक टंचाई : दसरा-दिवाळीच्या हंगामात मंदीचे सावट

राजाराम पाटील - इचलकरंजी -येथील यंत्रमाग उत्पादित कापडाचे घसरलेले भाव आणि कापड बाजारात निर्माण झालेली आर्थिक टंचाई यामुळे येथील वस्त्रोद्योगात अस्वस्थता पसरली आहे. आगामी दसरा-दिवाळीच्या हंगामात मंदीचे सावट पडल्याने यंत्रमागधारक व कापड व्यापारी वर्ग हवालदिल झाले आहेत.गतवर्षी डिसेंबर महिन्यापासून कापडाला चांगली मागणी आली आणि साध्या यंत्रमागापासून सेमी आॅटो व आॅटो लूमच्या उद्योजकांच्या कापडाला उत्तम दर मिळाला. जॉब वर्क (मजुरी) करणाऱ्या आॅटो यंत्रमागधारकांनाही प्रतीमीटर १६ ते १७ पैसे मजुरी मिळाली; पण मार्च २०१४ नंतर सेमी आॅटो व आॅटो लूम कारखानदारांचा पुन्हा जॉब रेट उतरला. त्याही परिस्थितीत काहीसा परवडणारा जॉब रेट मिळत असल्याने चार-पाच महिने आॅटो लूमचे कारखाने चालू राहिले.आॅटोलूमधारकांना पूर्वी प्रती वार्षिक सरासरी १६ ते १७ पैसे मीटरमागे मजुरी मिळत असे; पण यंदा मजुरीची सरासरी १३ ते १४ पैसेच राहिली आहे. त्यातच सध्या कापडाची मागणी एकदमच कमी झाली आणि जॉब रेट उतरला. सिमको लूमसाठी १३ ते १५ पैसे, रूटी-सीला ११ ते १३ पैसे, रॅपिअर लूमकरिता १० ते १३ पैसे व एअरजेट लूमसाठी १२ ते १४ पैसे प्रती मीटर मजुरी मिळत आहे. त्यामुळेच या लूमधारकांना दरररोज नुकसान सोसावे लागत आहे. शहर व परिसरात असलेल्या आॅटोलूमधारकांना दररोज पाच लाख रुपयांचा फटका बसत असल्याने खळबळ माजली आहे.दसरा-दिवाळीच्या हंगामातच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत असली, तरी निवडणुकीचा फारसा परिणाम कापड बाजारावर होणार नाही. कापड उद्योगातील बड्या व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडील पैसा ‘रियल इस्टेट’कडे वळविला आहे. परपेठांमध्ये विकलेल्या कापडाचे पैसे (पेमेंट) उशिराने मिळत आहे. हा कालावधी वाढत जाऊन ऐन दिवाळीत आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे. दसरा-दिवाळी सणामध्ये कामगारांना देण्यासाठी आणि घर खर्चाकरिता यंत्रमागधारक व कापड व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर पैसे लागतात. मात्र, सध्या असलेल्या आर्थिक टंचाईने वस्त्रोद्योगामध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे.मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर वस्त्रोद्योगामध्ये सुद्धा ‘अच्छे दिन’ येतील, अशी आशा उद्योजक व व्यापाऱ्यांना वाटत होती. तीन महिने होत आल,े तरी कापड बाजारातील परिस्थिती सुधारण्याऐवजी आर्थिक मंदी आल्याने उद्योजक, व्यापारी, व्याव्यावसायिक हवालदिल झाले आहेत.वस्त्रोद्योगात अस्वस्थताकापड बाजारातील आर्थिक टंचाई : दसरा-दिवाळीच्या हंगामात मंदीचे सावटराजाराम पाटील ल्ल इचलकरंजीयेथील यंत्रमाग उत्पादित कापडाचे घसरलेले भाव आणि कापड बाजारात निर्माण झालेली आर्थिक टंचाई यामुळे येथील वस्त्रोद्योगात अस्वस्थता पसरली आहे. आगामी दसरा-दिवाळीच्या हंगामात मंदीचे सावट पडल्याने यंत्रमागधारक व कापड व्यापारी वर्ग हवालदिल झाले आहेत.गतवर्षी डिसेंबर महिन्यापासून कापडाला चांगली मागणी आली आणि साध्या यंत्रमागापासून सेमी आॅटो व आॅटो लूमच्या उद्योजकांच्या कापडाला उत्तम दर मिळाला. जॉब वर्क (मजुरी) करणाऱ्या आॅटो यंत्रमागधारकांनाही प्रतीमीटर १६ ते १७ पैसे मजुरी मिळाली; पण मार्च २०१४ नंतर सेमी आॅटो व आॅटो लूम कारखानदारांचा पुन्हा जॉब रेट उतरला. त्याही परिस्थितीत काहीसा परवडणारा जॉब रेट मिळत असल्याने चार-पाच महिने आॅटो लूमचे कारखाने चालू राहिले.आॅटोलूमधारकांना पूर्वी प्रती वार्षिक सरासरी १६ ते १७ पैसे मीटरमागे मजुरी मिळत असे; पण यंदा मजुरीची सरासरी १३ ते १४ पैसेच राहिली आहे. त्यातच सध्या कापडाची मागणी एकदमच कमी झाली आणि जॉब रेट उतरला. सिमको लूमसाठी १३ ते १५ पैसे, रूटी-सीला ११ ते १३ पैसे, रॅपिअर लूमकरिता १० ते १३ पैसे व एअरजेट लूमसाठी १२ ते १४ पैसे प्रती मीटर मजुरी मिळत आहे. त्यामुळेच या लूमधारकांना दरररोज नुकसान सोसावे लागत आहे. शहर व परिसरात असलेल्या आॅटोलूमधारकांना दररोज पाच लाख रुपयांचा फटका बसत असल्याने खळबळ माजली आहे.दसरा-दिवाळीच्या हंगामातच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत असली, तरी निवडणुकीचा फारसा परिणाम कापड बाजारावर होणार नाही. कापड उद्योगातील बड्या व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडील पैसा ‘रियल इस्टेट’कडे वळविला आहे. परपेठांमध्ये विकलेल्या कापडाचे पैसे (पेमेंट) उशिराने मिळत आहे. हा कालावधी वाढत जाऊन ऐन दिवाळीत आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे. दसरा-दिवाळी सणामध्ये कामगारांना देण्यासाठी आणि घर खर्चाकरिता यंत्रमागधारक व कापड व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर पैसे लागतात. मात्र, सध्या असलेल्या आर्थिक टंचाईने वस्त्रोद्योगामध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे.मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर वस्त्रोद्योगामध्ये सुद्धा ‘अच्छे दिन’ येतील, अशी आशा उद्योजक व व्यापाऱ्यांना वाटत होती. तीन महिने होत आल,े तरी कापड बाजारातील परिस्थिती सुधारण्याऐवजी आर्थिक मंदी आल्याने उद्योजक, व्यापारी, व्याव्यावसायिक हवालदिल झाले आहेत.