शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

सीमा भागातील बस वाहतूक पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:22 IST

कोल्हापूर : सीमाभागाचा वाद पुन्हा उफळून आल्यानंतर गेल्या सहा दिवसांपासून एसटी महामंडळाची महाराष्ट्र-कर्नाटक ही बससेवा बंद करण्यात आली होती. ...

कोल्हापूर : सीमाभागाचा वाद पुन्हा उफळून आल्यानंतर गेल्या सहा दिवसांपासून एसटी महामंडळाची महाराष्ट्र-कर्नाटक ही बससेवा बंद करण्यात आली होती. ही बससेवा गुरुवारी दुपारपासून सुरू झाली. पहिल्या टप्प्यात ७ बसेस बेळगावकडे सोडण्यात आल्या. तर आज, शुक्रवारपासूनही सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.

सीमा भागात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या बेळगाव जिल्हा प्रमुखांच्या गाडीवर हल्ला केला. त्यामुळे कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकात उभ्या असलेल्या कर्नाटकच्या बसेसवर स्थानिक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काळी शाई फेकली. त्यानंतर सीमावाद पुन्हा उफाळला. शनिवारी (दि. १३) कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकात कोल्हापूर-स्वारगेट (पुणे) या मार्गावर धावणारी एसटी बस फलाटवर उभी होती. त्यावर एका कन्नडीगाने दगडफेक केली. त्यामुळे शनिवारपासून कोल्हापूर, बेळगावकडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग महामंडळाच्या सर्व बसेस बंद करण्यात आल्या. या मार्गावर १५ बसेसद्वारे ८० फेऱ्या या मार्गावर होत असत. मात्र, त्या सहा दिवसांपासून बंद झाल्यामुळे सुमारे ४२ लाखांचे नुकसान झाले आहे. याशिवाय हजारो प्रवाशांना खासगी वाहतुकीचा पर्याय स्वीकारावा लागला. त्यातून अनेकांच्या खिशाला अर्थिक चाट लागला तो वेगळाच. त्यामुळे ही सेवा पूर्ववत होणे सीमाभागातील प्रवाशांकरिता गरजेचे होते. सेवा सुरू झाल्याबद्दल या मार्गावर रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.

स्थानकासह परिसरातील व्यवसायावर परिणाम

गेले काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे कोल्हापुरातून सातारा, पुणे, औरंगाबाद,नागपूर, मुंबई या शहरांमध्ये जाणाऱ्या बसेसवर परिणाम झाला आहे. या जिल्ह्यातून कोल्हापुरात येणाऱ्या भाविक प्रवाशांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकासह परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेते, हाॅटेल व अन्य व्यवसायावर परिणाम झाला आहे.

त्यात गेल्या सहा दिवसांपासून कोल्हापुरातून कर्नाटककडे जाणाऱ्या राज्य शासनाच्या एसटी बसेसची सेवाही बंद झाल्यामुळे या व्यावसायिकांवर मोठा परिणाम झाला. आता शुक्रवारपासून ही सेवा पूर्ववत होणार असल्यामुळे या विक्रेत्यांनाही काही अशी दिलासा मिळाला आहे.