शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘अप्रगत विद्यार्थी शोध’चे पेपर फुटले

By admin | Updated: September 19, 2015 00:03 IST

सोईने घेतल्या परीक्षा : शाळांना सुट्या प्रश्नपत्रिकांचे वाटप; गोपनीयतेचा भंग

भीमगोंडा देसाई -- कोल्हापूर  इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या अप्रगत विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी राज्यस्तरावर तयार केलेली प्रश्नपत्रिका जिल्ह्यात फुटली आहे. सर्व शाळांमध्ये सुट्या प्रश्नपत्रिका एकाचवेळी पोहोच केल्या आहेत. मात्र, एकाच दिवशी ही परीक्षा घेणे बंधनकारक नसल्यामुळे सोईने परीक्षा घेतली जात आहे. यामध्ये गोपनीयतेचा भंग झाल्यामुळे अप्रगत विद्यार्थ्यांची वस्तुस्थितिदर्शक माहिती मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. परिणामी, ही चाचणी परीक्षा केवळ फार्स ठरणार आहे.शासनाच्या शालेय व क्रीडा विभागातर्फे प्रगत शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत यंदापासून अप्रगत विद्यार्थी शोधले जात आहेत. यासाठी शासकीय, खासगी शाळांतील दुसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात येणार आहे. मिळालेल्या अप्रगत विद्यार्थ्यांना दोन वर्षांत प्रगत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यासंबंधी जिल्हास्तरावर शिक्षण विभागाला प्रशिक्षण दिले आहे. गणित आणि भाषा विषयांची चाचणी १४ ते ३० सप्टेंबरअखेर घेण्याचे नियोजन केले आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने प्रश्नपत्रिका तयार करून त्या जिल्हा शिक्षण प्रशासनातर्फे शाळास्तरावर वितरित केल्या आहेत. भाषा विषयाच्या प्रश्नपत्रिका चार दिवसांपूर्वीच शाळा स्तरावर पोहोच केल्या आहेत. गणित विषयाच्या प्रश्नपत्रिका वाटण्याची प्रक्रिया सुरू आहे. शाळानिहाय प्रश्नपत्रिका देताना त्या पॅकिंग न करता सुट्या स्वरूपात मुख्याध्यापकांकडे सुपूर्द केल्या आहेत. गोपनीयताच नसल्यामुळे प्रश्नपत्रिका फुटल्या आहेत. रीतसर चाचणी घेण्याआधीच बहुतांश शाळांत प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या जात आहेत. सरावही करून घेतला जात आहे. एकाच दिवशी परीक्षा नसल्यामुळे प्रश्नपत्रिकांची सहजपणे देवाणघेवाण सुरू आहे. प्रश्नपत्रिका शिक्षक, विद्यार्थी यांना सहज उपलब्ध होत आहेत. त्यामुळे ही चाचणी परीक्षा केवळ फार्स ठरणार आहे. आधीच प्रश्नपत्रिका मिळाल्याने आणि सोयीनुसार परीक्षा घेतल्यामुळे अप्रगत विद्यार्थ्यांचा ठपका घ्यायचा नाही, म्हणून सर्वांनाच प्रगत दाखविण्याची संधी मुख्याध्यापक, शिक्षक यांना आयतीच मिळाली आहे. त्यामुळे अप्रगत विद्यार्थी मिळणार कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही चाचणी परीक्षा गोपनीय ठेवायची नाही, सोयीनुसार घ्यायची, असा वरिष्ठांचाच आदेश असल्याचा युक्तिवाद जिल्हास्तरीय शिक्षण प्रशासन करीत आहे. गोपनीयता नसेल तर चाचणी कसली, असा प्रश्न पालक विचारीत आहेत. त्यामुळे ‘शाळाबाह्य’प्रमाणेच अप्रगत विद्यार्थी शोधमोहिमेतही प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात अप्रगत असलेले विद्यार्थीही प्रगत दाखविणे सहज शक्य झाले आहे. त्यामुळे शासनाचा मूळ उद्देशच बाजूला पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.