शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

बिनविरोध निवडणूक गरजेची

By admin | Updated: June 10, 2016 00:17 IST

जयसिंगपूर बाजार समिती : १९ जागांसाठी १५३ अर्ज; १३ जूनला छाननी

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांशी निगडित असलेली जयसिंंगपूर कृषी उत्पन्न बाजार समिती अनेक समस्यांतून जात आहे़ शासन स्तरावर बाजार समितीबाबत उदासीनता आहे़ शिवाय निवडणुकीचा खर्च अशा सर्व बाबींचा विचार करता आणि राजकीय प्रतिष्ठा पणाला लावण्यापेक्षा ही निवडणूक बिनविरोध करण्याची गरज आहे़जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची ३ जुलैला पंचवार्षिक निवडणूक होत आहे़ एकूण १९ जागांसाठी तब्बल १५३ अर्ज दाखल झाले़ इतक्या मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्यामागे राजकीय प्रतिष्ठेचेच कारण पुढे आले आहे़ गत निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटना अशी झाली होती़ यामध्ये सर्व जागा जिंकून दिवंगत आमदार सा़ रे़ पाटील, शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने बाजी मारली होती़ शासनाच्या धोरणामुळे गेल्या पाच वर्षांतील बाजार समितीचा कारभार पाहता बाजार समितीच्या माध्यमातून म्हणावा तितका मोठा विकास झाला नसल्याचेच दिसून येते़ निवडून गेलेल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या परीने बाजार समितीचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे़ बाजार समिती सध्या अनेक अडचणींतून जात आहे़ शिवाय शासन पातळीवर विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न होताना दिसत नाहीत़ अशा कठीण परिस्थितीतून जात असलेल्या जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मात्र राजकीय ईर्ष्या लागली आहे़बाजार समितीचा जुना इतिहास पाहता त्यावेळी राजकीयदृष्ट्या मोठ्या प्रमाणात ईर्ष्या असायची़ आर्थिक अडचणीतून जात असलेल्या बाजार समितीची सध्या निवडणूक लागली, तर सुमारे ८ ते १० लाख रुपये खर्च निवडणुकीवर अपेक्षित आहे़ अशा परिस्थितीत शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, आमदार उल्हास पाटील, खासदार राजू शेट्टी यांच्यासह अन्य स्थानिक नेत्यांनी पुढाकार घेऊन ही निवडणूक बिनविरोध करण्याची गरज आहे़ निवडणूक बिनविरोध झाली, तर खर्च वाचणार आहे़ यामुळे सर्वच थरांतील नव्या चेहऱ्यांना संधी देऊन ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे़ राजकीय पक्षांनी एकत्र यावे : गतवैभव हवेसध्या होऊ घातलेल्या जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना व भाजपमधील इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत़ सर्व राजकीय पक्षांनी समविचाराने एकत्र येऊन ही निवडणूक बिनविरोध करून या संस्थेला गतवैभव प्राप्त करून देण्याची गरज बनली आहे़