शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत ‘सुटा’च्या सभेत अभूतपूर्व गोेंधळ

By admin | Updated: May 1, 2017 00:14 IST

सांगलीत ‘सुटा’च्या सभेत अभूतपूर्व गोेंधळ

सांगली : सुटा (शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ)च्या सांगलीतील वार्षिक सभेत रविवारी अभूतपूर्व गोंधळ झाला. सदस्य नसलेल्या लोकांच्या उपस्थितीवरून गदारोळ झाल्यानंतर सभा बेमुदत काळासाठी तहकूब करण्याचा निर्णय सुटाचे अध्यक्ष प्रा. डॉ. आर. एच. पाटील यांनी घेतला. त्यानंतरही सभागृहात दंगा सुरूच राहिला. दोन्ही गटाच्या प्राध्यापकांनी समांतर सभा घेऊन एकमेकांबद्दल संताप व्यक्त केला.सांगलीच्या मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाच्या सभागृहात दुपारी सुटाने वार्षिक सभा आयोजित केली होती. अध्यक्ष आर. एच. पाटील यांनी सभेला सुरुवात करण्यापूर्वी संघटनेचे सदस्य नसलेल्या लोकांना सभागृहाबाहेर जाण्याची सूचना दिली. त्यानंतर गोंधळास सुरुवात झाली. पदाधिकाऱ्यांची ही हुकूमशाही असल्याचे मत काही विरोधी सदस्यांनी मांडले. काही ज्येष्ठ सदस्य केवळ काही गोष्टींबाबतची माहिती घेण्यास आले असताना, त्यांना बाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला जात असल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. सदस्यांमध्ये दोन गट पडले. प्रचंड वादावादी आणि आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. अध्यक्षांनी दहा मिनिटांसाठी दोनवेळा सभा तहकूब केली. त्यानंतरही गोंधळ सुरुच राहिला. सत्ताधारी गटाच्या सदस्यांनी सांगली-कोल्हापूर असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यानंतर दोन्ही गटाचे सदस्य एकमेकांच्या अंगावर धावले. ज्येष्ठ सदस्यांच्या मध्यस्थीनंतर मारामारीची संभाव्य घटना टळली. सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक नवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याची जोरदार टीका विरोधी सदस्यांनी केली. अध्यक्ष पाटील म्हणाले की, सदस्य नसणाऱ्या लोकांनी सभागृहात उपस्थित राहणे हे घटनेच्या विरोधात आहे. त्यामुळे घटना मोडून कोणीही कोणते कृत्य करू नये. त्यावर विरोधी गटातील एका सदस्याने या गोष्टीला आक्षेप घेतला. निवडणुकीच्यावेळी मुदत संपल्यानंतर काही सदस्यांचे अर्ज मागे घेताना घटना मोडलेली चालते, मग संघटनेच्या सभेला केवळ उपस्थित राहिल्याने काय होणार आहे?, असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे वाद विकोपाला गेला. गदारोळातच सभा तहकूब करण्यात आली. त्यानंतर दोन्ही गटांनी समांतर सभा घेतल्या. विरोधी गटाच्या सदस्यांनी प्रा. रघुनाथ ढमकले यांच्या अध्यक्षतेखाली, तर सत्ताधारी गटाने आर. एच. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेतल्या. (प्रतिनिधी) का पडले प्राध्यापकांमध्ये गट?सत्ताधारी गटाने कोल्हापुरात अंबाई डिफेन्स येथे एका सोसायटीच्या जागेसाठी १ कोटी रुपये अ‍ॅडव्हान्स दिले आहेत. ही जागा निवासी वापराची असल्याने संघटनेची ही गुंतवणूक वादात अडकली आहे. अद्याप मालमत्तेला संघटनेचे नाव लागलेले नाही. ज्यांच्या स्वाक्षरीने १ कोटी रुपये या जागेपोटी भरण्यात आले, त्या पदाधिकाऱ्याकडून या रकमेची वसुली करावी, अशी विरोधी गटाची मागणी आहे. ऐनवेळच्या विषयात हा मुद्दा उपस्थित होणार होता. त्यापूर्वीच सभा गुंडाळण्यात आली. त्यामुळे समांतर सभा घेऊन विरोधी गटाने जागेत अडकलेली रक्कम वसूल करण्याबाबतचा ठराव मंजूर केला. संघटनेने निलंबित केलेल्या बी. आर. वडाम या लिपिकाच्या पुनर्नियुक्तीचा विषयही समांतर सभेत चर्चेस आला. या लिपिकाबद्दल पदाधिकारी हुकूमशाही पद्धतीने निर्णय घेत असल्याची टीका विरोधी गटाने केली.