शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई मंदिर परिसरातील अपरिचित ‘दुर्वास गणपती’

By admin | Updated: September 19, 2015 00:03 IST

सन १८७० मध्ये वासुदेव यज्ञेश्वर दीक्षित हे कोकणातून कोल्हापुरात राहण्यासाठी आले. त्यांना या काळात अंबाबाई मंदिराच्या परिसरात पाषाणातील पायाजवळ दुर्वास ऋषींची मूर्ती असलेला गणपती दृष्टिक्षेपास पडला.

सचिन भोसले -कोल्हापूर--श्री गणेशाचे वाहन म्हणून मूषक अर्थात उंदराला मोठे स्थान आहे. गणेशमूर्तीसमोर मूषकाचे स्थान कायम असते. मात्र, अंबाबाई परिसरातील तुळजाभवानी मंदिराशेजारी विनायक दीक्षित यांच्या अधिपत्याखाली पूजन होत असलेल्या, उंदरावर स्थानापन्न झालेल्या ‘दुर्वास गणेश’ची गोष्टच निराळी. हा दुर्वास गणेशही गेली अनेक वर्षे भक्तांपासून अपरिचितच राहिला आहे. सन १८७० मध्ये वासुदेव यज्ञेश्वर दीक्षित हे कोकणातून कोल्हापुरात राहण्यासाठी आले. त्यांना या काळात अंबाबाई मंदिराच्या परिसरात पाषाणातील पायाजवळ दुर्वास ऋषींची मूर्ती असलेला गणपती दृष्टिक्षेपास पडला. त्यांनी तो आपल्याकडेच ठेवून ‘आपला देव’ म्हणून त्याच्या पूजेला सुरुवात केली. कालांतराने या गणेशाची प्रतिष्ठापना त्यावेळी अंबाबाई मंदिरातील छोट्या मंदिरात करण्यात आली. तेथून पुढे आजतागायत या गणेशाच्या पूजनाचा मान दीक्षित कुटुंबीय यांच्याकडेच आहे.सध्या दीक्षित यांची पाचवी पिढी या गणेशमूर्तीची मनोभावे सेवा करीत आहे. ही सुबक गणेशमूर्ती काळ्या पाषाणात असून, मूषकावर आरूढ झालेली आहे. मूर्तीच्या पायांजवळ दुर्वास ऋषींची मूर्ती पहायला मिळते. ही गणेशमूर्ती सुमारे तीनशे वर्षांपूर्वीची असल्याचे जाणकार अभ्यासकांचे मत आहे. याचबरोबर या मूर्तीशेजारी पंचधातूंमधील दशभूजा गणेशाची मूर्तीही पहायला मिळते. या मूर्तीच्या मांडीवर सिद्धी आहे. ही मूर्तीही अनेक वर्षांपूर्वीची असल्याचे सांगितले जाते.दोन्ही मूर्ती गणेशभक्तांपासून गेली अनेक वर्षे दूर राहिल्या आहेत. या गणेशाच्या दर्शनासाठी अंबाबाई मंदिरातील विद्यापीठ हायस्कूलच्या दरवाजातून पायऱ्या उतरून आत जावे लागते. पुढे गेल्यानंतर तुळजाभवानी मंदिराजवळ दुर्वास गणपतीचे मंदिर आहे. काही जाणकार गणेशभक्तच या दुर्वास गणपतीच्या दर्शनासाठी आवर्जून जाताना दिसतात.