शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

उदगावला स्वतंत्र बसस्थानकाची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:18 IST

शुभम गायकवाड / उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) हे गाव सांगली-कोल्हापूर महामार्गालगत आहे. शासकीय कर्मचारी, खासगी कामगार, विद्यार्थी ...

शुभम गायकवाड / उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) हे गाव सांगली-कोल्हापूर महामार्गालगत आहे. शासकीय कर्मचारी, खासगी कामगार, विद्यार्थी व इतर वाहतूक असल्याने कायमस्वरूपी गजबजलेला परिसर असलेले आत्ताचे बसस्थानक आहे. नेहमीचा रहदारीचा रस्ता असल्याने कित्येकदा या मार्गावर अपघात झाले आहेत. त्यामुळे गावासाठी स्वतंत्र बसस्थानक असावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

सध्याचे बसस्थानक हे अगदीच तोकडे असून बसथांब्यासाठी खास जागा नाही. थांब्यासमोरच इतर खासगी वाहनेही उभी असतात. तेथूनच प्रवाशांची चढउतार होत असते. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळते.

स्वतंत्र बसस्थानकाला मुख्य रस्त्यावरच हनुमान पाणीपुरवठ्यासमोर शासकीय मालकीची मोठी जागा उपलब्ध आहे. या ठिकाणी स्वतंत्र बसस्थानक होऊ शकते. तसे झाल्यास कोल्हापूर, इचलकरंजी, मिरज, सांगली येथून येणाऱ्या बसेससाठी थांबा मिळेल. त्यामुळे नागरिकांची उदगावला सर्व बसेसचा थांबा असावा, ही कायमची मागणी आपोआपच पूर्ण होणार आहे.

चौकट -

लांब पल्ल्याच्या बसेसचा नेहमीच अन्याय

उदगाव येथे एकही लांब पल्ल्याची बस थांबत नाही. शिवाय सांगली, कोल्हापूरला जाणाऱ्या लाल फलक असलेल्या बसेसही थांबत नाहीत. या प्रश्नावर अनेक वेळा आंदोलने झाली आहेत. प्रशासनाने लेखी पत्र देऊनही बसेस थांबत नसल्याने हा थांबा नेहमीच वादात राहिला आहे.

कोट -

उदगावला स्वतंत्र बसस्थानक व्हावे यासाठी परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांना भेटून मागणी करणार आहोत. हनुमान पाणीपुरवठासमोर बसस्थानक झाल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊन प्रवासी, वाहतूकधारकांना शिस्त लागणार आहे. - सागर कदम, संस्थापक, ड्रीम फौंडेशन

फोटो - २६१२२०२०-जेएवाय-०३

फोटो ओळ - सध्या उदगाव बसथांब्यासमोर मुख्य रस्त्यावरच प्रवाशांची चढउतार होत असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे; तर दुसऱ्या छायाचित्रात उदगाव-कोल्हापूर मुख्य रस्त्यालगत उपलब्ध असणारी जागा.