शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ वादावादीचे प्रकार; सकाळीच बहुतांश मतदान

By admin | Updated: November 2, 2015 00:44 IST

बारा प्रभागांत सकाळी ११ पर्यंत सरासरी २२ टक्के मतदान

कोल्हापूर : ध्यानचंद हॉकी स्टेडियम विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या बारा प्रभागांत सकाळी ११ पर्यंत सरासरी २२ टक्के मतदान झाले. केंद्राजवळ थांबण्यावरून कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात किरकोळ वादावादीचे प्रकार घडले. मतदान प्रक्रिया संथगतीने सुरू राहिल्याने केंद्राबाहेर लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, तपोवन प्रभागातील शीलादेवी शिंदे हायस्कूलमधील शाहू मराठी शाळा केंद्रावर सकाळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आईसह येऊन मतदानाचा हक्क बजावला. आमदार अमल महाडिक यांनी सर्वच प्रभागांतील केंद्रांवर भेट देऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली. सकाळी नऊ ते साडेअकरा या वेळेत गर्दीने उच्चांक गाठला. काही मतदारांनी केंद्राबाहेर लागलेली रांग पाहून ‘नंतर येऊ’ असे म्हणत परत जाणे पसंत केले. मतदार यादीतील घोळाचा फटका अनेक मतदारांना बसला. यादीत नाव नसल्यामुळेही काही मतदारांची तारांबळ उडाली. ४० हजार ६३२ मतदान... ध्यानचंद हॉकी स्टेडियमच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या बारा प्रभागांत २९ हजार ६६५ स्त्रियांचे, तर ३० हजार ५५८ पुरुषांचे असे एकूण ६० हजार २२३ मतदार आहेत. त्यापैकी १९ हजार ७३६ स्त्रियांनी आणि २० हजार ८९६ पुरुष असे एकूण ४० हजार ६३२ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. बारा प्रभागांत सर्वाधिक रामानंदनगर-जरगनगर प्रभागात ७२ टक्के मतदान झाले. काही काळ गोंधळ साळोखेनगर प्रभागात शिवशक्ती विद्यालयातील केंद्रात मोठी गर्दी होती. सुरुवातीला पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे उमेदवार व समर्थक केंद्राजवळ जाऊन आवाहन करीत होते. येथे मतदान अधिकाऱ्याने मतदार यादीत दुबार नाव असलेल्या मतदारांना रोखले. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेत दुबार नाव असलेल्यांनाही मतदान करू दिले.