शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी.च्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

By admin | Updated: December 20, 2015 00:39 IST

मलकापुरात दुर्घटना : कोल्हापुरातील युवकावर काळाचा घाला

मलकापूर : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या उपमार्गावर एसटीची दुचाकीला धडक बसून युवक जागीच ठार झाला. मलकापुरच्या हद्दीत शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. तुषार तानाजी सूर्यवंशी (वय ३०, रा. मलकापूर, मूळ रा. कसबा बावडा, ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कसबाबावडा येथील तुषार सूर्यवंशी हा युवक स्थापत्य अभियंता (बी. ई. सिव्हील) असून, सध्या तो मलकापुरातील ‘सी. बी. कन्स्ट्रक्शन’ या कंपनीत नोकरीस होता. सुमारे तीन वर्षांपासून तो नोकरीनिमित्त मलकापुरात वास्तव्यास होता. शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे विठ्ठलदेव सोसायटीमधील कंपनीच्या कार्यालयात गेला. कार्यालयातील काम आटोपून काही वेळानंतर तो कामानिमित्त कऱ्हाडकडे जाण्यासाठी निघाला. साडेदहा वाजण्याच्या सुमारास तो उपमार्गावर एका शॉपसमोर पोहोचला असताना पाठीमागून आलेल्या एसटीने (एमएच १४ बीटी ०८३३) त्याच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे तुषार दुचाकीसह रस्त्यावर कोसळला. त्यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मदतीला आले. त्यांनी उपचारार्थ रुग्णालयात हलविले. मात्र, त्याठिकाणी पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अपघाताची नोंद कऱ्हाड शहर पोलिसांत झाली आहे. (प्रतिनिधी) काही वेळातच दुसरा अपघात ज्याठिकाणी एसटी व दुचाकीचा अपघात झाला त्याचठिकाणीकाही वेळात दुसरा अपघात झाला. मालवाहतूक रिक्षाने एका दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला. या अपघातानंतर नागरिकांनी रिक्षा चालकाला बेदम चोप दिला. घटनेची नोंद कऱ्हाड पोलिसांत झाली नव्हती.