शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यासाठी मुलींची दोन नवी वसतिगृहे

By admin | Updated: May 13, 2016 00:59 IST

१५ जूनला होणार सुरू : कोल्हापूर शहर, इचलकरंजीचा समावेश

प्रवीण देसाई -- कोल्हापूर  -शासनाच्या समाजकल्याण विभागाकडून कोल्हापूर जिल्ह्यासाठी मुलींकरिता दोन वसतिगृहे मंजूर झाली आहेत. कोल्हापूर शहर व इचलकरंजी या ठिकाणी १५ जूनला ती सुरू करण्यात येणार आहेत. प्रत्येकी १०० जागांच्या क्षमतेची ही वसतिगृहे आहेत.राज्य शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त काही धोरणात्मक निर्णय घेऊन राज्यात ५० वसतिगृहे मंजूर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मार्च महिन्यात घेतला आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासाठी मुलींची दोन वसतिगृहे मंजूर झाली आहेत. त्यामध्ये कोल्हापूर शहर व इचलकरंजीचा समावेश आहे. सध्या मुलींची सहा वसतिगृहे असून त्यामध्ये नव्याने दोन वसतिगृहांची भर पडणार असल्याने इतर वसतिगृहांवरील ताण यानिमित्ताने थोडा हलका होणार आहे. कोल्हापूर शहरात सध्या रमणमळा येथे मुलींचे ७५ जागांची क्षमता असलेले वसतिगृह आहे. ते अपुरे पडत असून अनेक महाविद्यालयीन मुलींना प्रवेशासाठी प्रतीक्षेत राहावे लागत आहे. तसेच काहींना जागा संपल्याने प्रवेशही मिळत नाही. ही अडचण लक्षात घेता शहरात आणखी एका वसतिगृहाला मंजुरी मिळाल्याने मुलींची सोय होणार आहे. पहिल्या टप्प्यात ही वसतिगृहे भाड्याच्या इमारतीमध्ये सुरू करण्यात येणार आहेत. शहरातील जागा निश्चित झाली असली तरी जिल्हा समाजकल्याण विभागाने हे ठिकाण अद्याप जाहीर केलेले नाही. इचलकरंजी येथे अद्याप वसतिगृहाच्या जागेसाठी शोध सुरू आहे. समाजकल्याण विभागाने इचलकरंजी नगरपालिकेला पत्र पाठवून आपल्या मालकीच्या जागा असल्यास कळवा, असे सांगितले आहे.लवकरच जागानिश्चिती होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. इचलकरंजी शहरात महाविद्यालयांची संख्या जास्त आहे. त्या तुलनेत मुलींना राहायला वसतिगृहे नसल्याने आसपासच्या परिसरातील मुलींची गैरसोय होत आहे. या वसतिगृहाच्या निमित्ताने ती दूर होणार आहे.मुलांची १० वसतिगृहे जिल्ह्यात सध्या मुलांची कोल्हापूर शहर, कागल, चंदगड, गारगोटी, गडहिंग्लज, आजरा, हातकणंगले, पन्हाळा, जयसिंगपूर-शिरोळ, राधानगरी या ठिकाणी वसतिगृहे आहेत. शाहूवाडी व गगनबावडा या ठिकाणी अद्याप वसतिगृहे नाहीत.मुलींची सहा वसतिगृहेजिल्ह्यात सध्या मुलींची कोल्हापूर शहर, हातकणंगले, जयसिंगपूर, गारगोटी, गडहिंग्लज, आजरा याठीकाणी सहा वसतिगृहे आहेत.राज्य शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार जिल्ह्यासाठी मुलींकरिता दोन वसतिगृहे मंजूर झाली आहेत. १५ जूनला ती सुरू होणार आहेत. कोल्हापूरची जागानिश्चिती झाली असून इचलकरंजीसाठी जागेचा शोध सुरू आहे. लवकरच ती मिळेल.- विजयकुमार गायकवाड, आयुक्त, समाजकल्याण विभाग