शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीर मद्यवाहतूक प्रकरणी दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:26 IST

कोल्हापूर : शहरात ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर मद्याची वाहतूक करणारा टेम्पो शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या पथकाने पकडला. ...

कोल्हापूर : शहरात ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर मद्याची वाहतूक करणारा टेम्पो शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या पथकाने पकडला. कारवाईत पोलिसांनी सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वाईन्सच्या मालकासह टेम्पोचालकावर जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा नोंदवला. वाईन्स मालक कुणाल कुमार सोनवणे (रा. आझाद चौक परिसर) व टेम्पोचालक अमर आनंदराव झांझगे (रा. कसबा सांगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ३१ डिसेंबरच्या पार्श्‍वभूमीवर शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या पथकाने चोरट्या व बेकायदेशीर मद्य वाहतुकीवर लक्ष ठेवले आहे. बुधवारी त्या पथकाला हॉकी स्टेडियम ते गोखले कॉलेज चौक मार्गावर पिवळ्या रंगाच्या हौदा टेम्पो संशयास्पदरीत्या जाताना आढळला. त्यांनी टेम्पोचालकाची तपासणी केली. टेम्पोचालक अमर झंगझगे याने टेम्पोतील मद्याचा मालक संशयित कुणाल सोनवणे याच्या सांगण्यावरून शहरातील नऊ बार व हॉटेलमध्ये पोहोचविण्यास जात असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी टेम्पोसह दोन लाख १९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोघा संशयितावर गुन्हा दाखल केला.

ओपन बार, बेकायदेशीर मद्यविक्री प्रकरणी कारवाई

गेल्या काही दिवसांत शहर परिसरात उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्या ३६९ जणांवर तसेच बेकायदेशीर दारूविक्री करणाऱ्या ३३ जणांवर, बेकायदेशीर मद्याची वाहतूक प्रकरणी ४७ जणांवर, तर वाहन कायद्यांतर्गत २०४५ जणांवर कारवाई केल्याचे पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

फोटो नं. ३०१२२०२०-कोल-दारु कारवाई

ओळ : ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस उपअधीक्षकाच्या विशेष पथकाने बुधवारी बेकायदेशीर मद्याची वाहतूक करणारा टेम्पो कोल्हापूर शहरात पकडला. सुमारे दोन लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केला.