शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचे दोघे ताब्यात

By admin | Updated: August 17, 2014 00:44 IST

सिलिंडर काळाबाजार : एजन्सीचे नाव निष्पन्न; संशयितास कोठडी

सांगली : घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरमधून गॅस काढून तो मोकळ्या सिलिंडरमध्ये भरल्याप्रकरणी अटकेत असलेल्या शाहरुख खतीब यास इलेक्ट्रीक मोटारींचा पुरवठा करणाऱ्या कोल्हापुरातील दोन व्यापाऱ्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आज (शनिवार) सायंकाळी ताब्यात घेतले. दरम्यान, खतीबला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून ५० सिलिंडर जप्त करण्यात आले होते. यापैकी २० सिलिंडर सांगलीतील एका गॅस एजन्सीने पुरविली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.दोन दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कर्नाळ रस्त्यावरील शिवशंभो चौकात छापा टाकून बेकायदा गॅस सिलिंडरचा साठा जप्त केला होता. याप्रकरणी खतीबला अटक केली होती. तो भरलेल्या सिलिंडरमधील गॅस मोकळ्या सिलिंडरमध्ये भरुन देण्याचा व्यवसाय करीत होता. यासाठी त्याने शिवशंभो चौकातील शब्बीर अथणीकर यांची खोली भाड्याने घेतली होती. गॅस भरुन देण्यासाठी तो इलेक्ट्रीक मोटारींचा वापर करीत होता. चार मोटारी जप्त केल्या होत्या. या मोटारी त्याने कोल्हापुरातील व्यापाऱ्यांकडून खरेदी केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. या व्यापाऱ्यांना ताब्यात घेण्यासाठी गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, उपनिरीक्षक संदीप चव्हाण यांचे पथक रवाना झाले होते. पथकाने दोघांना सायंकाळी ताब्यात घेतले. रात्री उशिरा पथक सांगलीत दाखल झाले. दोन्ही व्यापारी मूळचे गुजरातचे आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून ते कोल्हापुरात राहत आहेत. एकाचा वाहनातील गॅसकीटचे स्पेअरपार्ट विक्रीचा, तर दुसऱ्याचा गॅसकीटचे यंत्र दुरुस्तीचा व्यवसाय आहे. व्यायाऱ्यांनी या मोटारी गुजरातमधून आणून खतीबला दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांची कसून चौकशी सुरु आहे. तपासाच्याद्दष्टीने त्यांची नावे सांगण्यास नकार दिला. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात गॅस भरुन देणारे २५ व्यावसायिक आहेत. या सर्वांना त्यांनीच मोटारींचा पुरवठा केल्याचा संशय आहे. एक मोटार गॅस भरुन देण्यासाठी अर्धा तास सुरु ठेवली, तर ती गरम होऊन स्फोट होण्याची शक्यता असते. यामुळे खतीब चार मोटारींचा वापर करीत होता. (प्रतिनिधी)