शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

दोन बल्बचे बिल १८ हजार रुपये !

By admin | Updated: October 13, 2015 00:26 IST

ढगेवाडीतील प्रकार : वीज कंपनीची अनागोंदी

ऐतवडे बुद्रुक : ढगेवाडी (ता. वाळवा) येथील वीज ग्राहक आप्पासाहेब भाऊ खोत यांना वीज वितरण कंपनीने वीज बिलाचा जबरदस्त झटका दिला आहे. घरी फक्त दोन बल्ब असलेल्या खोत यांना सप्टेंबर महिन्याचे १७ हजार ८३0 रुपये बिल पाठवून वीज वितरणचा अंदाधुंद कारभार दाखवून दिला आहे.येथील आप्पासाहेब भाऊ खोत यांचा ग्राहक क्रमांक २८४७९0२५६६२८ आहे. त्यांच्या घरी फक्त दोन बल्ब आहेत. त्यांना डिसेंबर २0१४ पासून वाढीव बिल येत आहे. त्यावेळी त्यांना आठ हजार रुपये बिल आले होते. त्यानंतर त्यांनी स्थानिक वायरमन व ऐतवडे बुद्रुक येथील शाखा कार्यालयात तक्रार दाखल केली होती. त्यांना तात्पुरते बिल कमी करुन देण्यात आले व त्यानंतर बिल व्यवस्थित येईल, असे आश्वासन दिले गेले. परंतु तेव्हापासून दर महिन्याला वाढीव बिल येत होते व दर महिन्याला आप्पासाहेब खोत कार्यालयात जाऊन बिल कमी करुन घेत आहेत.बिलाचे रीडिंग व मीटर नादुरुस्त असल्यास बदलून मिळावे यासाठीही त्यांनी अर्ज दिला आहे. शिवाय दर महिन्याला बिल भरुन देखील सप्टेंबरअखेर त्यांना १७ हजार ८३0 रुपये बिल आले आहे. वीज वितरणच्या कारभाराचा त्रास संबंधित ग्राहकाला सहन करावा लागत आहे. बिलाबाबत तोडगा काढावा, अन्यथा वीज कार्यालयासमोर गांधीगिरी पध्दतीने आंदोलन करण्याचा इशारा खोत यांनी दिला आहे. (वार्ताहर)ऊर्जामित्र बैठकीत तक्रारशिराळा येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘ऊर्जामित्र’ बैठकीत खोत यांनी याबाबतची तक्रार केली होती. त्यावेळी आ. शिवाजीराव नाईक यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते. यावेळी खोत यांना ताबडतोब बिल दुरुस्ती करून देण्याचे व आवश्यकता असल्यास मीटर बदलून देण्याचे सांगण्यात आले होते. परंतु अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.