शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राला दुहेरी मुकुट

By admin | Updated: January 16, 2017 01:03 IST

राष्ट्रीय शालेय स्पर्धा : हरियाणा, पंजाब उपविजेते; सोनाली हेळवी, बबलू गिरीची अष्टपैलू खेळी

शिरोळ : अत्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धेत मुले व मुली या दोन्ही महाराष्ट्र संघांनी दुहेरी मुकुट पटकाविला. यामध्ये मुली विभागात महाराष्ट्र विरुध्द हरियाणा यांच्यात झालेल्या लढतीमध्ये महाराष्ट्र संघ विजेता ठरला. तर मुलांत झालेल्या महाराष्ट्र विरुध्द पंजाब या लढतीत महाराष्ट्र संघ विजयी ठरला. विजयी संघ सहकारमहर्षी डॉ. सा. रे. पाटील चषकाचे मानकरी ठरले. शिरोळ येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व. बाबासाहेब लडगे क्रीडानगरी येथे सलग चार दिवस सुरू झालेल्या ६२ व्या राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धेचा रविवारी अंतिम दिवस होता. मुली विभागात झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र विरुध्द हरियाणा यांच्यातील लढत लक्ष्यवेधी ठरली. क्षणाक्षणाला उत्कंठावर्धक ठरलेल्या या सामन्यात महाराष्ट्र संघाने हरियाणाला पराभूत करून ३ गुणांनी हा सामना जिंकत अजिंक्यपद पटकावले. महाराष्ट्राच्या सोनाली हेळवी हिने अष्टपैलू खेळी केली. तर मुले विभागात महाराष्ट्र विरुध्द पंजाब असा अंतिम सामना झाला. बबलू गिरी याच्या अष्टपैलू खेळीमुळे महाराष्ट्राने २२ विरुध्द ९ असा सामना जिंकून विजेतेपद पटकावले. तत्पूर्वी रविवारी उपांत्य फेरीच्या सामन्याला प्रारंभ झाला. मुले विभागात महाराष्ट्राने हरियाणाला केवळ एका गुणाने पराभूत केले. दुसरा सामना पंजाब विरुध्द केरळ असा झाला. या सामन्यात पंजाब विजेता ठरला. मुलींच्या विभागात हिमाचल प्रदेश विरुध्द महाराष्ट्र सामन्यात महाराष्टाने ४ गुणांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसरा सामना दिल्ली विरुध्द हरियाणा असा होऊन यामध्ये हरियाणाने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुले विभागात हरियाणाने केरळाला पराभूत केले तर मुलींच्या विभागात हिमाचलने दिल्लीला पराभूत केले. यावेळी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील,इंडियन डेअरी असोशिएशनचे अध्यक्ष अरुण नरके, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार उल्हास पाटील, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक नरेंद्र सोपल, स्पर्धा निरीक्षक जे. सी. शर्मा व मूर्ति (मध्यप्रदेश), तांत्रिक निरीक्षक दलवीर सिंग (दिल्ली), पंच प्रमुख अजित पाटील, स्पर्धा संयोजक अमरसिंह पाटील, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे अध्यक्ष विजयराज मगदूम, नगरसेविका अ‍ॅड. सोनाली मगदूम, प्रा. संभाजी पाटील, प्रा. आण्णासाहेब गावडे, जिल्हा क्रीडाधिकारी माणिक वाघमारे, रावसाहेब देसाई, अशोकराव माने, एम. व्ही. पाटील, प्रमोद लडगे, राष्ट्रीय खेळाडू नितीन मदने उपस्थित होते. (प्रतिनिधी)