शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेबाबतच्या निर्णयाकडे बारावीच्या विद्यार्थ्यांच्या नजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:24 IST

यावर्षीच्या सीबीएसई बारावीच्या परीक्षेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील ५५० विद्यार्थ्यांनी, तर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेसाठी कोल्हापूर, सांगली, ...

यावर्षीच्या सीबीएसई बारावीच्या परीक्षेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील ५५० विद्यार्थ्यांनी, तर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील एकूण एक लाख २३ हजार ५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दरवर्षी फेब्रुवारी, मार्च दरम्यान परीक्षा होऊन त्यांचा निकाल मे महिन्याच्या अखेरीस अथवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतो. मात्र, यंदा कोरोनामुळे सीबीएसई आणि राज्य शिक्षण मंडळाने दहावीची परीक्षा रद्द केली; पण बारावीची परीक्षा घेण्याचे गेल्या महिन्यात जाहीर केले. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बारावीच्या परीक्षा घेण्याबाबत अंतिम निर्णय सरकारने घेतलेला नाही. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी रविवारी या परीक्षेबाबत उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यामध्ये महत्त्वाच्या विषयाची परीक्षा घेणे अथवा परीक्षेचे स्वरूप बदलणे असे दोन पर्याय सांगितले आहेत. त्यावर राज्यांनी मंगळवार (दि. २५)पर्यंत सूचना सादर करण्यास त्यांनी सांगितले आहे. त्यानंतर पुढील निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले आहे. परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत येत्या दोन दिवसांत चर्चा करणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयाकडे बारावीच्या विद्यार्थ्यांच्या नजरा लागल्या आहेत.