शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

तुंबलेल्या गटारी, रस्त्यावर सांडपाणी

By admin | Updated: December 29, 2014 00:45 IST

राखीव प्रभागात समस्याही राखीव : अपुरा पाणीपुरवठा, कचरा समस्या, खराब अंतर्गत रस्ते

कोल्हापूर : बहुतांश कॉलनीचा भाग असलेली वस्ती म्हणजे पाटोळेवाडी-कदमवाडी प्रभाग होय. या प्रभागात मुख्य रस्ते झाले; पण काही कॉलन्यांमधील अंतर्गत रस्ते तसे पडून असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर पाटोळेवाडीच्या परिसरात पिछाडीस सांडपाणी जाण्याची व्यवस्था नसल्याने ते पाणी थेट शेजारील शेतात जाते. तसेच सह्याद्री हौसिंग सोसायटी उद्यानासाठी राखीव असलेल्या जागेचा अक्षरश: कोंडाळा झाला आहे. या आरक्षित जागेवर लवकरात लवकर उद्यान व्हावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. दुसरीकडे नगरसेविका रेखा आवळे या सतत संपर्क असल्यामुळे या प्रभागातील समस्या सोडविल्या असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.पाटोळेवाडी-कदमवाडी हा प्रभाग (क्रमांक १३) राखीव मतदारसंघ आहे. या प्रभागात सुमारे पाच हजार ७४२ मतदार आहेत. या प्रभागात कपूर वसाहत, घाटगे कॉलनी, शिवराज कॉलनी, विजयनगर कॉलनी, ग्रीन पार्क, डी. वाय. पाटील महाविद्यालयाची पिछाडीची बाजू, सह्याद्री हौसिंग सोसायटी अशी बहुतांश कॉलनीची रचना आहे; तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्यांची वस्ती आहे. सर्वसामान्य व मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्या याठिकाणी आहे. विशेषत: कॉलनीतील नागरिकांसह सर्वसामान्यांच्या तक्रारींची दखल स्थानिक नगरसेविका घेतात. विशेषत: कदमवाडी येथील कपूर वसाहतीमधील कदमवाडी स्मशानभूमीचे काम नगरसेविकांनी चांगले केले आहे.कदमवाडी रस्त्यावरील या प्रभागाचा शेवटचा भाग म्हणजे सह्याद्री हौसिंग सोसायटी. येथे रोज दुपारी एक वाजता, तर रात्री आठ वाजता पाणी येते; पण त्याचा दाब कमी असतो. त्यामुळे नागरिकांना अपुरे पाणी मिळते आहे. हा पाण्याचा प्रश्न सोडवावा, तसेच डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजजवळ रिक्षाथांबा आहे. त्या चौकातून ते घाटगे कॉलनीपर्यंतचा मुख्य रस्ता नवीन करावा, अशी मागणी होत आहे.या प्रभागात मुख्य रस्ते, कपूर वसाहती-मधील कदमवाडी स्मशानभूमी चांगली केली आहे. कोणत्याही स्थितीत सह्याद्री हौसिंग सोसायटीमधील आरक्षित जागेवर उद्यान होण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार आहे. उर्वरित दहा महिन्यांत जास्तीत जास्त विकासनिधी आणून प्रभागात अलौकिक काम करू.- रेखा अनिल आवळे,नगरसेविका.प्रतिबिंब प्रभागाचेगणेश शिंदे