शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तुळजापूर-मालवण एस.टी.ला अपघात

By admin | Updated: May 12, 2016 23:56 IST

कोल्हापूरजवळ घटना : चालकासह २९ प्रवासी जखमी; डंपरला धडक

शिरोली : तुळजापूर-मालवण एस.टी. बसने डंपरला पाठीमागून धडक दिल्याने बस महामार्गाच्या दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघातात बस चालकासह २९ प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे-बंगळूर महामार्गावर शेजारी शिरोलीच्या हद्दीत सायंकाळी साडेपाच वाजता झाला. अधिक माहिती अशी की, एस.टी. (एमएच २० बी एल-२९५७) तुळजापूरहून मालवणला भरधाव वेगाने चालली होती. शिरोलीच्या हद्दीत महामार्गावरून जात असताना पंचगंगा नदीशेजारी बसने पुढील डंपरला (एमएच ०९ एल ९११५) मागून धडक दिली. एसटीचालक एस. एन. सुवेर्शे याचा गाडीवरील ताबा सुटला आणि ब्रेक अडकल्याने एस.टी. दुभाजकावर जोरदार आदळली. यात २९ प्रवासी जखमी झाले. जखमींत दहा महिलांचा समावेश आहे. सर्वांवर सीपीआरमध्ये उपचार केले. जखमी प्रवासी सांगली, मिरज, उस्मानाबाद आणि कोल्हापूर येथील आहे.जखमींना बस व रिक्षाने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. जखमींची नावे - उत्कर्षा जगन कराडे (वय २०) सुजाता जगन कराडे (४०) उज्ज्वल जगन कराडे (१५), चैतन्य कार्वेकर (३५), प्रणोती दशरथ ढवळे (२४), रेवती दशरथ ढवळे (२०), राजश्री दशरथ ढवळे (४८, सर्व रा. सांगली). शीला प्रताप जमादार (४०), प्रियांका प्रताप जमादार (१४), सुशीला बबरू स्वामी (५०), बबरू शिवाप्पा स्वामी (६०, सर्व रा. मिरज), त्याचबरोबर प्रफुल्ल शशीराव सूर्यवंशी (२५, रा. उमरगा, जि. उस्मानाबाद). अपघातात बसचालक जखमी झाले आहेत. यामध्ये १२ जखमींवर सीपीआर तर आठ जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, या आपघातानंतर महामार्गावरील सर्व वाहतूक सुमारे दोन तास विस्कळीत झाली होती, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, आपघाताची ची नोंद शिरोली पोलिस ठाण्यात रात्री उशीर सुरू होती. (प्रतिनिधी)