शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

‘कोजिमाशि’च्या लौकिकासाठी प्रयत्न

By admin | Updated: April 27, 2015 00:19 IST

बाळ डेळेकर : मुरगूडमध्ये पार पडला सत्कार सोहळा; महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था

मुरगूड : महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था म्हणून कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संस्थेकडे पाहिले जाते. पारदर्शक कारभार, सभासदांच्या हिताचे निर्णय, यामुळे सहकारातील दिशादर्शक ठरलेल्या या संस्थेमध्ये सभासदांच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेऊन ‘कोजिमाशि’चा नावलौकिक वाढविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे अभिवचन संस्थेचे माजी अध्यक्ष व नवनिर्वाचित संचालक लक्ष्मण ऊर्फ बाळ डेळेकर यांनी दिले.मुरगूड (ता. कागल) या जन्मगावी शिक्षण प्रसारक मंडळाच्या मुरगूड विद्यालयामध्ये आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रशालाचे प्राचार्य पी. व्ही. शिंदे होते. यावेळी जन्मगावी झालेल्या यथोचित सत्काराने डेळेकर भारावून गेले. यावेळी उपमुख्याध्यापक जे. डी. पाटील, पर्यवेक्षक एस. आर. पाटील, उपप्राचार्य बी. एन. घोरपडे, पी. एस. पाटील, एन. टी. पाटील, डी. एस. कुंभार, आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी प्राचार्य पी. व्ही. शिंदे, वडगाव विद्यालयातील प्रा. पी. एस. पाटील, समीर कटके, आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी पी. बी. लोकरे, शाम पाटील, संजय सूर्यवंशी, शिक्षक प्रतिनिधी सुनील बोरवडेकर, एल. आर. सुदर्शनी, एस. जी. चांदेकर, अनिल भोई, एम. बी. टेपुगडे, यशोदा देशमुख, श्रीकांत कुंभार, आर. जी. पाटील, एस. बी. नायकवडी, कार्यालयीन प्रमुख आय. सी. पाटील, प्रा. विराजित घोरपडे, आदी उपस्थित होते. एस. आर. पाटील यांनी आभार मानले. ए. एन. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.