शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

महिलेवर बलात्कार करून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न

By admin | Updated: May 18, 2015 01:17 IST

पतीलाही मारहाण : कोथळीतील तोतया पोलिसाला महिलेच्या नातेवाइकांकडून बेदम चोप

कोल्हापूर : कोल्हापूर-राधानगरी रस्त्यावर कोथळी (ता. करवीर) येथे लघुशंकेसाठी थांबलेल्या महिलेवर बलात्कार करून तिच्यासह कुटुंबाला पोलीस असल्याची बतावणी करून ब्लॅकमेल करणाऱ्या नराधमास रविवारी दुपारी महिलेच्या नातेवाइकांनी बेदम चोप देत करवीर पोलिसांच्या ताब्यात दिले. संशयित नंदकुमार दिनकर पाटील (वय ३७, रा. कोथळी, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, पीरवाडी (ता. करवीर) येथील एक दाम्पत्य शुक्रवारी (दि. १५) कुरुकली येथे नातेवाइकांकडे निघाले होते. यावेळी महिला मोपेड, तर पती मोटारसायकल चालवीत होता. रात्री सव्वाआठच्या सुमारास ते दोघेजण कोथळी आणि हळदी गावांच्या पौंड नावाच्या शेताजवळील ओढ्यावर आले असता महिला लघुशंकेसाठी थांबली. यावेळी पती रस्त्यावरच गाडीवर बसून राहिला. त्याच ठिकाणी रस्त्याकडेला असलेल्या शेतामध्ये संशयित नंदकुमार पाटील त्याचे मित्र मच्छिंद्र व तानाजी असे तिघेजण उसाला पाणी पाजत होते. यावेळी त्यांना अंधारात दाम्पत्य दिसले. यावेळी पाटील हा महिलेचा हात पकडून तिला उसामध्ये घेऊन जाऊ लागला. भेदरलेल्या महिलेने आरडाओरड केली. यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या पतीने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्याला मारहाण केली. त्याच्या मित्रांनी ‘तू असे काही करू नकोस. सोड, त्यांना जाऊ दे,’ असे सांगितले; परंतु त्याने त्यांनाही दमदाटी करीत पतीच्या समोरच महिलेवर उसाच्या शेतामध्ये नेऊन बलात्कार केला. सुमारे अर्ध्या तासाने महिलेला सोडून तो मित्रांसह निघून गेला. जाताना त्याने दोघांच्या गाड्यांचा नंबर घेतला होता. त्यानंतर भेदरलेले दाम्पत्य पुढे न जाता तिच्या माहेरी आले. भीतीपोटी दाम्पत्याने घडलेल्या प्रकाराची कोठेही वाच्यता केली नाही. दरम्यान, संशयित नंदकुमार पाटील याने शनिवारी महिलेच्या मोपेड गाडीच्या नंबरवरून प्रादेशिक परिवहन कार्यालयातून तिचा माहेरचा पत्ता शोधून काढून दुपारी तो मित्रासह तिच्या घरी गेला. यावेळी तिची आई एकटीच घरी होती. त्याने ‘मी करवीर पोलीस ठाण्यातून आलोय. तुमच्या मुलगीने गाडीचा अपघात केला आहे. त्याचे दीड हजार रुपये नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई देताय, की गुन्हा दाखल करू?’अशी धमकी त्यांना दिली. यावेळी भीतीने त्यांनी त्याला एक हजार रुपये दिले. पैसे घेऊन तो निघून गेला. त्यानंतर आईने मुलीला फोन करून या प्रकाराची माहिती दिली. तिने पतीला हा प्रकार सांगिल्यानंतर त्यांनी त्याला धडा शिकविण्याचा निर्णय घेतला. संशयिताचा मित्र मच्छिंद्र हा रंकाळा स्टँड येथून कोल्हापूर ते हळदी असे वडाप करतो. एक-दोन वेळा वडापने प्रवास करताना तिने त्याला पाहिले होते. बलात्काराची घटना घडली त्यावेळी तोही त्याठिकाणी होता. त्यामुळे दाम्पत्याने नातेवाइकांना सोबत घेऊन त्याला रंकाळा स्टॅँड येथे गाठले. त्याला विचारणा केली असता त्याने नंदकुमार पाटील याचे नाव सांगितले. पाटील हा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. त्यामुळे त्याच्याशी मोबाईलवर संपर्क साधून जमीन व्यवहारासंबंधी चर्चा करायची आहे, अशी बतावणी करून त्याला बोलावून घेतले. दुपारी दीडच्या सुमारास तो रंकाळा बसस्थानकावर येताच महिलेच्या नातेवाइकांनी त्याची चांगलीच धुलाई केली. बेदम चोप देत त्याला करवीर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केली. (प्रतिनिधी)