गडहिंग्लज : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या खूप वाढली आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व घटकांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी केले.
शिवसेनेतर्फे येथील उपजिल्हा रुग्णालयाला दोन व्हेंटिलेटर प्रदानप्रसंगी ते बोलत होते. प्रा. मंडलिक यांच्या हस्ते वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप आंबोळे यांच्याकडे व्हेंटिलेटर सुपूर्द करण्यात आले.
मंडलिक म्हणाले, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन उपजिल्हा रुग्णालय अधिक सक्षम करण्यात येईल.
या वेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे, संघटक संग्राम कुपेकर यांची भाषणे झाली.
कार्यक्रमास नगरसेवक नरेंद्र भद्रापूर, डॉ. चंद्रकांत खोत, सुनील शिंत्रे, संभाजी पाटील, दिलीप माने, सोमगोंडा आरबोळे, बाळेश नाईक, उदय कदम, रमेश मगदूम, शशिकांत चोथे, बाळकृष्ण परीट आदी उपस्थित होते.
------------------------
फोटो ओळी : गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाला खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते व्हेंटिलेटर प्रदान करण्यात आले. या वेळी विजय देवणे, संग्राम कुपेकर, सुनील शिंत्रे, दिलीप आंबोळे, नरेंद्र भद्रापूर आदी उपस्थित होते.
क्रमांक : १६०६२०२१-गड-१०