शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

टस्कर हटविण्यासाठी प्रयत्न

By admin | Updated: March 4, 2015 00:42 IST

वाकिघोलमध्ये वनकर्मचारी कार्यरत : पिके वाचविण्यासाठी धडपड

राधानगरी : राधानगरी अभयारण्याच्या वाकिघोल परिसरात आलेल्या टस्कराने घेतलेल्या एका बळीमुळे येथील नागरिकांबरोबर वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांचीही झोप उडाली आहे. दिवसभर जंगलात दडणारा हत्ती रात्री गावाजवळच्या शेतात घुसतो. तो मानवी वस्तीत येऊ नये म्हणून वन्यजीवचे कर्मचारी पंधरा दिवसांपासून रात्रंदिवस गस्त घालत आहेत. शेतकरीही पिके वाचविण्यासाठी धडपडत आहेत.मागील काही वर्षांत येथील गव्यामुळे होणाऱ्या नुकसानीला येथील शेतकरी वैतागले आहेत. उन्हाळभर दररोज रात्री गव्यांना हुसकावण्याचे कामच शेतकऱ्यांना लागले आहे. गव्याच्या हल्ल्यात पाळीव जनावरे तसेच माणसेही जखमी झाली आहेत. काहींना प्राणही गमवावा लागला आहे. बिबट्याने पाळीव जनावरे मारण्याचे प्रकारही अनेकदा घडले आहेत. या सर्व त्रासांमुळे शेतकऱ्यांमध्ये वनविभागाबद्दल मुळातच असंतोष आहे. हत्तीच्या आगमनामुळे त्यामध्ये आणखी भर पडली आहे. हत्तीच्या हल्ल्यात बळी पडलेल्या बाळकू आरेकर यांचा मृतदेह ताब्यात घेताना हा असंतोष प्रकट झाला होता. त्याचा उद्रेक होऊ नये यासाठी वन्यजीव विभागाचे कर्मचारी रात्रंदिवस धडपडत आहेत. यापूर्वी सात वर्षांपूर्वी आलेल्या टस्करानेही असाच धुमाकूळ घातला होता. तो थेट हसणे, राधानगरीजवळच्या परिसरात आला होता. त्याचा माग काढण्यासाठी गस्त घालताना एका वनमजुराला प्राणाला मुकावे लागले होते. त्यामुळे गस्तीवरील कर्मचाऱ्यांच्याही जिवाला धोका आहे. तरीही दिवसभर जंगलात असणारा हत्ती रात्री मानवी वस्तीत घुसू नये यासाठी हे कर्मचारी कार्यरत आहेत. येथील कर्मचाऱ्यांबरोबर चांदोली, कोयना येथील कर्मचारीही यासाठी नेमण्यात आले आहेत.त्यामुळे यासाठी वन्यजीव विभागाने हत्ती हटाव मोहीम हाती घेण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. सिंधुदुर्गात ही मोहीम यशस्वी झाली आहे; पण हा परिसर अभयारण्यात येतो. त्यामुळे काही कायदेशीर अडचणी असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. हत्तीला विरोध म्हणून नव्हे, तर माणसांच्या जगण्यासाठी तरी याबाबत वन्यजीव विभागाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)वाकिघोल परिसरात अजूनही मोठ्या प्रमाणात उसाचे पीक उभे आहे. शिवाय केळी, उसाची लावण, खोडवा अशी हिरवे पिके असल्याने हत्तीला ती पर्वणीच आहे. जवळच काळम्मावाडी धरणाचे पाणी असल्याने या परिसरातून हा हत्ती सहजासहजी जाण्याची शक्यता कमी आहे.