शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सात जिल्हा बँकांचे बिगुल वाजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:24 IST

राजाराम लोंढेे लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : उच्च व सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेल्या राज्यातील ३८ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया ...

राजाराम लोंढेे

लोकमत न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : उच्च व सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेल्या राज्यातील ३८ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सोमवारी (दि. ४) राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सुरू केली आहे. यामध्ये ‘बीड’, ‘औरंगाबाद’, ‘परभणी’, ‘नांदेड’, ‘अहमदनगर’, ‘गडचिरोली’, ‘अकोला’ या सात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा समावेश आहे. त्याचबरोबर २५ विकास संस्थांच्या निवडणुकाही होणार आहेत.

राज्य शासनाने २७ जानेवारी २०२० रोजी सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली होती. मार्च २०२० पर्यंत मुदत दिली असली तरी, तोपर्यंत कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्याने तीन-तीन महिने निवडणुकांना मुदतवाढ दिली आहे. मात्र ही मुदतवाढ देताना उच्च व सर्वोच्च न्यायालयाने ज्या संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत आदेश केले आहेत, त्यांना वगळण्यात आले होते. जरी न्यायालयाचे आदेश असले तरी, कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत हाेता. त्यामुळे अशा वातावरणात निवडणुका घेणे अशक्य होते. आता संसर्ग कमी झाल्याने निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्याच्या हालचाली शासन पातळीवर आहे.

या संस्थांच्या निवडणुका...

जिल्हा बँक : बीड, अहमदनगर, परभणी, गडचिरोली, औरंगाबाद, अकोला, नांदेड.

साखर कारखाने : मुळा- नेवासा, लोकनेते घुले पाटील-नेवासा, वृध्देश्वर- पाथर्डी.

विकास संस्था : बाबुर्डी- अहमदनगर, मांध्ये- अहमदनगर, बाबुर्डी बेंड- अहमदनगर, वाळूंज- अहमदनगर, खिर्डी- श्रीरामपूर, राजे शिवछत्रपती- श्रीगोंदा, दशमी गव्हाण-अहमदनगर, घोटवी- श्रीगोंदा, सिध्देश्वरवाडी- पारनेर, सारोळा- अहमदनगर, निंब नांदूर- शेवगाव, सुरेगाव- श्रीगोंदा, मुंगूसगाव- श्रीगोंदा, मल्हार निंबोडी- अहमदनगर, माता साळवणदेवी- श्रीगोंदा, माळ वडगाव- श्रीरामपूर, जनाई- श्रीगोंदा, कारेगाव- श्रीरामपूर, सेवा -वाशीम, दिवशी बुद्रुक- नांदेड, दिवशी खुर्द- नांदेड, भोसी- नांदेड, बटाळा-नांदेड, लाेहगाव- नांदेड, दुगाव- नांदेड.

बँक- धुळे-नंदूरबार जिल्हा पगारदार बँक.

पतसंस्था - सर्वोदय शिक्षण प्रसारक, जळगाव व सवादा, जळगाव.

इतर पात्र संस्थांबाबत आज निर्णय...

कर्जमाफी व कोरोनामुळे राज्यातील हजारो संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत. मुदतवाढीची मुदत आज, गुरुवारी संपत आहे. निवडणूक घेण्याबाबत मंत्रिमंडळातच दोन गट असले तरी, ही फाईल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गेली आहे. निवडणूक घ्यायची की पुन्हा तीन महिने लांबणीवर टाकायची, याचा आज निर्णय अपेक्षित आहे.