शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

ॲन्टिजन किटमधील त्रुटी दूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:17 IST

कोल्हापूर : आरटीपीसीआरच्या तुलनेत रॅपिड ॲन्टिजन चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त येत आहे, ॲन्टिजनमध्ये पॉझिटिव्ह असलेल्यांची आरटीपीसीआर निगेटिव्ह ...

कोल्हापूर : आरटीपीसीआरच्या तुलनेत रॅपिड ॲन्टिजन चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त येत आहे, ॲन्टिजनमध्ये पॉझिटिव्ह असलेल्यांची आरटीपीसीआर निगेटिव्ह येत आहे. त्यामुळे या दोन्ही किटमध्ये काय फरक आहे, त्रुटी आहेत का, याची तपासणी करावी, अशी सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी केली. यावेळी त्यांनी कोरोनातील डेल्टा प्लस विषाणू व तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी, असेही निर्देश दिले.

कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषा कुंभार उपस्थित होत्या. मंत्री मुश्रीफ म्हणाले, इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालय व गडहिंग्लजमधील उपजिल्हा रुग्णालयासाठी सिटी स्कॅन मशीन लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावेत. जिल्ह्यात 'कोरोनामुक्त गाव' अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा. जेणेकरून ग्रामीण भागातील रुग्ण संख्या नियंत्रणात येऊ शकेल.

जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, जिल्ह्यात तपासण्या वाढवण्यात आल्या असून कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्याला रोज ५० हजार लसींचा पुरवठा होणे गरजेचे आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी गर्दी टाळून प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे.

--

अधिक लसींसाठी प्रयत्न

यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी लसीचे अधिक डोस मिळावेत यासाठी आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय तसेच हाफकिन संस्थेच्या कार्यकारी संचालकांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. मुंबई-पुण्याप्रमाणे जिल्ह्याची एकूण लोकसंख्या व बाधितांचे प्रमाण यानुसार लसीचे डोस मिळणे गरजेचे आहे. रोज ५० हजार डोस दिले तरी प्रशासन यंत्रणा लावून लसीकरण पूर्ण करेल, त्यानुसार लसीचा पुरवठा करावा अशी मागणी केली.

--

कोकणमुळे डेल्टा प्लसचा धोका

जिल्ह्यात अद्याप डेल्टा प्लस विषाणू असलेला कोरोना रुग्ण आढळलेला नाही. मात्र कोकणात याचे प्रमाण अधिक आहे. कोकण कोल्हापूरच्या जवळ असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील अनेक रुग्ण येथे उपचारासाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत. बंधने नसल्याने दोन्ही जिल्ह्यातील नागरिक ये-जा करत असतात त्यामुळे कोल्हापूरला याचा धोका अधिक असून अधिक खबरदारी घेण्याची गरज असल्याचेही मुश्रीफ म्हणाले.

--

फोटे नं २५०६२०२१-कोल-कोरोना बैठक

ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक झाली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे उपस्थित होते.

--