शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

गिरगाव परिसरात वृक्षतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:24 IST

भुदरगड तालुक्यातील निसर्गसंपन्न गिरगाव शेजारील तमाशाचा खडक परिसरातील वनक्षेत्रात अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड होत आहे. वृक्षतोडीमुळे निसर्गाने ...

भुदरगड तालुक्यातील निसर्गसंपन्न गिरगाव शेजारील तमाशाचा खडक परिसरातील वनक्षेत्रात अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड होत आहे. वृक्षतोडीमुळे निसर्गाने नटलेला परिसर उजाड होण्याच्या मार्गावर आहे. वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

फये-हेदवडे-गिरगाव परिसर येथे पर्यटक येथे भेट देतात, पण निद्रीस्त वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे राजरोस वृक्षतोड सुरू आहे. एकीकडे शासन वृक्ष लागवडीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करते, पण दुसरीकडे वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वृक्षतोड झाल्याने निसर्गसंपन्न परिसर उद्‌ध्वस्त होत आहे. या गंभीर घटनेमुळे निसर्गप्रेमींतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वृक्षतोडीमुळे परिसर उजाड होण्याची भीती निर्माण झाली आहे. राजरोस तोड होत असल्यामुळे निसर्गप्रेमी नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

गिरगावजवळील तमाशाचा खडक परिसरात येथे तोडलेल्या लाकडाचे ढीग टाकले आहेत. वृक्षतोड करून निसर्गसंपन्न परिसर उजाड बनविणाऱ्या लोकांवर कारवाई व्हावी, अशी मागणी निसर्गप्रेमींतून होत आहे.

--

फोटो ओळ

२४गिरगाव ट्री

गिरगाव परिसरात वृक्षतोड